ETV Bharat / state

जिल्हाधिकारी आस्तिक पांडे यांनी स्वीकारला बीड चा पदभार; टंचाई, वाळू चोरी अन शांततेत निवडणुका पार पडण्याचे आव्हान

नुतन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सोमवारी बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

आस्तिक कुमार पांडे
author img

By

Published : Feb 27, 2019, 11:26 PM IST

बीड - नुतन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सोमवारी बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी एम. डी. सिह यांच्या २ वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात जलसंधारण तसेच पिक विमा वाटपाच्या क्षेत्रात चांगले काम झाले आहे. आता नव्याने पदभार स्वीकारलेले अस्तिक कुमार पांडे यांच्या समोर बीड जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती व येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान आहे.

याशिवाय बीड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था तसेच वाळू माफिया व गुंडगिरी रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकारी पांडे यांच्यावर आहे. रुजू होतात पांडे यांनी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या विभागात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाची देखील पाहणी केली. यानंतर दिवसभराच्या कामकाजाला पांडे यांनी सुरुवात केली. जिल्ह्याची ओळख करून घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा उद्देश आहे, असे पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था पासून ते पुरवठा विभागातील धान्य माफिया पर्यंतच्या सर्व अनागोंदी कारभार रोखण्याचे मोठे आव्हान नवे जिल्हाधिकारी पांडे यांच्यासमोर राहणार आहे.

बीड जिल्ह्यात १४ ते १५ वाळूपट्टे आहेत. या वाळू पट्ट्यांचा लिलाव झालेला नसताना देखील अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे. दिवसाढवळ्या वाळू बीड शहरातून वाहून नेली जाते. बीड शहर तसेच ग्रामीण हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक चालतात. असे असताना देखील वाळू माफियांना पोलीस रोखत नाहीत. याचा 'अर्थ' काय या सर्व बाबींकडे बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अस्तिक कुमार पांडे कसे पाहतात हे पाहण्यासाठी जरा वेळ जावा लागणार आहे.

undefined

Intro:जिल्हाधिकारी आस्तिक पांडे यांनी स्वीकारला बीड चा पदभार; पाणी टंचाई निवारणा बरोबरच शांततेत निवडणुका पार पडण्याचे आव्हान

बीड- नवे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सोमवारी बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मावळते बीड चे जिल्हाधिकारी एम. डी. सिह यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात जलसंधारण तसेच पिक विमा वाटपाच्या क्षेत्रात चांगले काम झाले आहे. आता बीड जिल्हाधिकारी म्हणून नव्याने पदभार स्वीकारलेले अस्तिक कुमार पांडे यांच्या समोर बीड जिल्ह्यातील पाणी टंचाई ची परिस्थिती व येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था तसेच वाळू माफिया व गुंडगिरी रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकारी पांडे यांच्यावर आहे.

Body:बीड जिल्हाधिकारी म्हणून सोमवारी अस्तिक कुमार पंडे हे बीडला रुजू झाले. रुजू होतात पांडे यांनी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली याशिवाय कर्मचाऱ्यांच्या विभागात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालया देखील पाहणी केली. सर्व कर्मचाऱ्यांची त्यांच्या भागात जाऊन भेट घेतली यानंतर दिवसभराच्या कामकाजाला पांडे यांनी सुरुवात केली बीड जिल्हा ची ओळख करून घेऊन प्रामाणिकपणे काम करण्या चा माझा उद्देश आहे. असे पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था पासून ते पुरवठा विभागातील धान्य माफिया पर्यंतच्या सर्व अनागोंदी कारभार रोखण्याचे मोठे आव्हान नवे जिल्हाधिकारी पांडे यांच्यासमोर राहणार आहे.

Conclusion:बीड जिल्ह्यात 14 ते 15 वाळूपट्टे आहेत या वाळू पट्ट्यांचा लिलाव झालेला नसताना देखील अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे. दिवसाढवळ्या वाळू बीड शहरातून वाहून नेली जाते. बीड शहर तसेच ग्रामीण हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळूचे टिप्पर चालतात. असे असताना देखील वाळू माफियांना पोलीस रोखत नाहीत. याचा 'अर्थ' काय या सर्व बाबींकडे बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अस्तिक कुमार पांडे कसे पाहतात हे पाहण्यासाठी जरा वेळ जावा लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.