ETV Bharat / state

परवाना नूतनीकरणासाठी 35 हजाराची लाच घेताना सहायक आयुक्ताला रंगेहाथ पकडले

अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्ताला ३५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत.

assistant-commissioner-arrested-for-taking-bribe-in-beed
परवाना नूतनीकरणासाठी 35 हजाराची लाच घेताना सहाय्यक आयुक्तांना रंगेहात पकडले
author img

By

Published : Mar 19, 2020, 2:05 PM IST

बीड - अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्ताला ३५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. कृष्णा दाभाडे असे लाच घेणाऱ्या सहायक आयुक्ताचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत.

बीड येथील एक व्यापारी दुकानाचा परवाना नूतनीकरण करून घेण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून अन्न व औषध विभागाकडे चकरा मारत होते. मात्र, सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी पैशाची मागणी करत होते. अखेर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातच 35 हजार रुपये लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले. याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.