ETV Bharat / state

आष्टीचे भूमिपुत्र किशोर शिंदे यांच्या पथकाने केला १३ नक्षलवाद्यांचा खात्मा - किशोर शिंदे पथकाने केला १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागातील चमके कोटमे पेढी जंगल भागामध्ये दि. 21 रोजी नक्षलवाद्यांकडून पोलिस किशोर शिंदे पथकावर अंदाधुंद गोळीबार केला जात असताना प्रतिकार दाखवत पथकाने 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त केले आहे.

विशेषपत्र
विशेषपत्र
author img

By

Published : May 24, 2021, 11:13 AM IST

आष्टी- (बीड) तालुक्यातील सांगवी आष्टी या गावचे रहिवासी असलेले पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे हे सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागातील चमके कोटमे पेढी जंगल भागामध्ये दि. 21 रोजी नक्षल विरोधी अभियान चालवत असताना जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांची माहिती घेऊन कारवाई करत असताना नक्षलवाद्यांकडून पोलिस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला जात असताना प्रतिकार दाखवत समयसूचकता आणि बुद्धी कौशल्याचा वापर करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे हे प्रभारी असलेल्या पथकाने 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त केले आहे.

पोलिस अधीक्षकांकडून कौतुकाची थाप

या घटनेमध्ये नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर अत्याधुनिक शस्त्र-अस्त्रे जप्त करण्यात आली आहेत . या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी विशेषपत्राद्वारे पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे प्रभारी असलेल्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा- 'सुरेश जाधव हे कंपनीचे अधिकृत प्रवक्ते नाही, त्यांना यावर बोलण्याची परवानगी नाही'

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.