ETV Bharat / state

बीडमध्ये आशा वर्कर्सचे आंदोलन; प्रतिमहिना १० हजार रुपये मानधन देण्याची मागणी

author img

By

Published : Aug 8, 2019, 8:41 AM IST

सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आशा वर्कर्सच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी अनेक आश्वासने दिली होती. मात्र, एकही आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप आशा वर्कर्सनी आंदोलनावेळी केला.

आशा वर्कर्सचे आंदोलन

बीड - जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार आशा वर्कर्सवर अन्याय करत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

बीडमध्ये आशा वर्कर्सचे आंदोलन; प्रतिमहिना १० हजार रुपये मानधन देण्याची मागणी

सरकार सध्या अडीच हजार रुपये दरमहिना भत्ता देत आहे. मात्र, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे अडीच हजार रुपये भत्ता आणि महागाईचा कुठेच मेळ बसत नाही. त्यामुळे सरकारने प्रतिमहिना १० हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आशा वर्कर्सच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी अनेक आश्वासने दिली होती. मात्र, एकही आश्वासन सरकारने पाळले नाही. आशा सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही. या सर्व प्रकारामुळे आमच्यावर अन्याय होत आहे, असे आरोप यावेळी करण्यात आले. तसेच यासंबंधीत एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आशा व गटप्रवर्तक यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेचा कायदा करा, आशा व गटप्रवर्तक यांना कामगार म्हणून घोषित करा, विधानसभेच्या पटलावर मानधनवाढीचे जी.आर काढण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करा यासह अनेक मागण्या आंदोलनादरम्यान केल्या.

Intro: प्रति महिना दहा हजार रुपये मानधन द्या; बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन आक्रमक

बीड- शासनाच्या प्रत्येक कामात मदत करणाऱ्या आशा स्वयंसेविका वर हे सरकार अन्याय करत असल्याचे, सांगत बुधवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आशा वर्कर्स यांनी दिलेल्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. सरकार आम्हाला सध्या 2500 रुपये सरासरी दर महिना भत्ता देत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई व पंचवीसशे रुपये भत्त, कुठेच मेळ बसत नाही. शासनाने बीड जिल्ह्यातील आशा वर्कर सकारात्मक विचार करून प्रतिमहिना दहा हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी उपस्थित महिलांनी केली.

Body:यापूर्वी सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याबरोबर आशा वर्कर प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली तेव्हा अनेक आश्वासने दिले. मात्र एकही आश्वासन सरकारने पाळले नाही. वेट बी गारान प्रमाणे आशा वर्कर यांना राबवून घेतले जाते. मात्र आशा सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही. या सर्व प्रकारामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. असे सांगत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशा व गटप्रवर्तक आन साठी सामाजिक सुरक्षेचा कायदा करा, आशा व गटप्रवर्तक यांना कामगार म्हणून घोषित करा, विधानसभेच्या पटलावर मानधनवाढीचे जी आर काढण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करा, यासह विविध मागण्या आशा व गटप्रवर्तक आंदोलनादरम्यान केल्या.

Conclusion:जिल्हाधिकारी यांना दिलेला निवेदनावर आशा वर्कर युनियन चे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरे, प्रा. बी. जी. खाडे, मोहन जाधव, उर्मिला शेंडगे, सुवर्णा रेवले, सत्यभामा सुरवसे, उमा वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.