ETV Bharat / state

बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. सुरेश साबळे यांची नियुक्ती

बीडचे पूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांच्याकडून त्यांचा पदभार काढून त्यांच्या जागी डॉ. सुरेश साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी कोरोना वार्डची पाहणी केली आहे.

बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. सुरेश साबळे

author img

By

Published : Jun 11, 2021, 7:24 AM IST

बीड - बीड जिल्हा रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदी डॉ. सुरेश साबळे यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. कोरोनाच्या काळात बीड जिल्हा रुग्णालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. याशिवाय मृत्यू दर देखील रोखण्यामध्ये रुग्णालय प्रशासनाला अपयश आले होते. यामुळे केवळ तीन ते चार महिन्यातच पूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांच्याकडून बीड जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार काढून घेत डॉ. गीते यांना केज तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील शासकीय रुग्णालयाचा पदभार देण्यात आला आहे. नवे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर साबळे यांनी पदभार स्वीकारताच कोविड वार्डचा राऊंड घेऊन कोरोना पॉझिटिव रुग्णांची स्थिती जाणून घेतली.

पदभार स्वीकारताच कोरोना वार्डची केली पाहणी

बीड जिल्ह्यातील तसेच जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचे मोठे आव्हान डॉक्टर साबळे यांच्या समोर आहे. जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांचे खाजगी रुग्णालय आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही. याबाबत सतत तक्रारी होत असतात. परंतु अद्यापपर्यंत सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या खाजगी रुग्णालयाबाबत ठोस कारवाई झालेली नाही. डॉ. सुरेश साबळे यांच्या सामोर हे महत्त्वाचे आव्हान असणार आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव रुग्णांचा मृत्यू दर रोखण्यासाठी विशेष उपाय योजना देखील डॉ. साबळे यांना करावे लागणार आहे. गुरुवारी सायंकाळी साबळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार स्वीकारताच कोरोना वार्डचा राऊंड घेऊन दाखल असलेल्या रुग्णांची स्थिती जाणून घेतली.

अवघ्या चार महिन्यातच डॉ. गीते यांची बदली

साधारणता चार महिन्यापूर्वी डॉ. अशोक थोरात यांच्या जागी डॉ. सूर्यकांत गिते यांना बीड जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार देण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मिळालेली अपुरी आरोग्य व्यवस्था, यामुळे डॉ. गीते यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. एवढेच नाही तर डॉ. गीते यांची रुग्णालय प्रशासनावर पकड नसल्याच्या अनेक बाबी समोर आल्या होत्या.

हेही वाचा - शेत तळ्यात बुडून बाप-लेकासह एकाचा मृत्यू; गेवराई तालुक्यातील दैठणा येथील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.