ETV Bharat / state

आपेगावचा पशुवैद्यकीय दवाखाना बनला हायटेक - आपेगावचा पशुवैधकीय दवाखाना

या उपक्रमाच्या माध्यमातून दवाखान्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. शिवाय पुशींची काळजी कशी घ्यावी हे सांगणारे सुविचारही लिहीण्यात आले आहेत. यामुळे सर्वांचेच लक्ष दवाखान्याकडे वेधले जात आहे.

hospital
आपेगावचा पशुवैद्यकीय दवाखाना बनला हायटेक
author img

By

Published : Mar 4, 2021, 11:55 AM IST

Updated : Mar 4, 2021, 12:12 PM IST

अंबाजोगाई (बीड)- सुदंर माझे कार्यालय या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील आपेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -2 हा आकर्षक बनला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दवाखान्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. शिवाय पुशींची काळजी कशी घ्यावी हे सांगणारे सुविचारही लिहीण्यात आले आहेत. यामुळे सर्वांचेच लक्ष दवाखान्याकडे वेधले जात आहे.

कार्यालयाचा परीसर स्वच्छ राहून काम करण्याठी प्रसन्न राहावे यासाठी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत कुंभार यांनी कार्यालय सुंदर करण्यासाठी कार्यालय प्रमुखांना आदेश दिले होते. त्यानुसार कार्यालय प्रमुखांने हे काम लोकसहभागातून करावे असे निर्देश दिले होते. आपेगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. कोकणे यांनी आपल्या संकल्पनेतून दवाखान्यास रंगरोगटी करुन घेतली आहे. रंगरंगोटी बरोबरच दखाखान्याच्या दर्शनी भिंतीवर पशुंची काळजी घेण्यासंदर्भात सुवीचार लिहीले आहेत. कार्यालय स्थापनेपासून प्रथमच कार्यालय आकर्षक बनल्याने नागरीकांचे लक्ष वेधले जात आहे.

Last Updated : Mar 4, 2021, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.