ETV Bharat / state

...आणि तिचे सतरावे बाळ पोटातच दगावले; बीडच्या लंकाबाईची व्यथा

माजलगाव येथील लंकाबाई या पालावर आयुष्य जगणाऱ्या महिलेला मरण यातना भोगाव्या लागत आहेत. लंकाबाई चक्क सतराव्या वेळी गरोदर होत्या. साधारण अडीच-तीन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात एक महिला सतराव्यांदा गरोदर असतानाही जिवंत कशी? असे अनेक प्रश्न विविध माध्यमांमधून उपस्थित झाले होते.

beed
...आणि तीचे सतरावे बाळ पोटातच दगावले; बीडच्या लंकाबाईची व्यथा
author img

By

Published : Dec 20, 2019, 9:15 AM IST

बीड - नशिबी अठराविश्व दारिद्र्य असलेल्या जिल्ह्यातील माजलगाव येथील लंकाबाई राजेभाऊ खरात या महिलेच्या व्यथा अन वेदना हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. लंकाबाई चक्क सतराव्या वेळी गरोदर होत्या. त्यांच्या १६ बाळंतपणापैकी तीन मुलं आणि नऊ मुली वाचल्या तर 4 बाळं जन्मताच दगावली. त्यांना झालेले सतरावे बाळ पोटातच दगावले असून मुलगी होती.

...आणि तीचे सतरावे बाळ पोटातच दगावले; बीडच्या लंकाबाईची व्यथा

माजलगाव येथील लंकाबाई या पालावर आयुष्य जगणाऱ्या महिलेला मरण यातना भोगाव्या लागत आहेत. लंकाबाई चक्क सतराव्या वेळी गरोदर होत्या. साधारण अडीच-तीन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात एक महिला सतराव्यांदा गरोदर असतानाही जिवंत कशी? असे अनेक प्रश्न विविध माध्यमांमधून उपस्थित झाले होते. बीड जिल्हा आरोग्य विभागाने त्या महिलेच्या आरोग्याची हमी घेतली होती. एवढेच नाही तर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये लंकाबाईंचा समावेश कसा झाला नाही. हा देखील प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले होते.

हेही वाचा - दिलिप केंद्रे आत्महत्या प्रकरण; प्रेयसी पूजा पाटीलची २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

लंकाबाईंची या ऊसतोड कामगार असून त्यांच्या घरची परिस्थिती बिकट आहे. त्या आपल्या पतीसह कर्नाटकातील एका साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेल्या होत्या. माजलगाव ते कर्नाटक असा प्रवास ट्रॅक्टरमधून केल्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या फडात जाईपर्यंत लंकाबाई खरात यांचे पोटातील बाळ पोटातच मृत झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी दिली आहे.

हेही वाचा - गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

सौंदरमल म्हणाल्या, की लंकाबाई या माजलगाव येथील रहिवासी असून त्यांचे संपूर्ण कुटुंब शहराजवळच पाल ठोकून राहते. तीन महिन्यांपूर्वी त्या सतराव्यांदा गरोदर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी लंकाबाईंच्या आरोग्याची काळजी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने घेतली. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी लंकाबाई आणि तिचे संपूर्ण कुटुंब ऊसतोडणीसाठी कर्नाटकामध्ये गेल्यामुळे तिचा आणि माझा संपर्क तुटला. माजलगाव ते कर्नाटक या दरम्यानचा प्रवास ट्रॅक्टरमधून केल्यामुळे लंकाबाईच्या पोटातील बाळ मृतावस्थेत जन्माला आले. दरम्यान, कर्नाटकमधील संकेश्वर साखर कारखान्याची उचल लंकाबाई आणि त्यांच्या पतीने घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी सांगितले.

Intro:बीडच्या लंकाबाई ची व्यथा; अखेर तिचे सतरावे बाळ देखील जन्मले मृतावस्थेत

बीड- नशिबी अठराविश्व दारिद्र्य आलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लंकाबाई राजेभाऊ खरात या महिलेच्या व्यथा अन वेदना हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. लंकाबाई चक्क सतराव्या वेळी गरोदर होत्या त्यांच्या 16 बाळंतपणापैकी तीन मुलं आणि नऊ मुली वाचल्या तर 4 बाळ जन्मताच मरण पावले आहेत. आता सतरावे बाळ देखील ( मुलगी) पोटातच दगावलेली जन्मली आहे. कर्नाटक मधील संकेश्वर साखर कारखान्याची उचल लंकाबाई व त्यांच्या पतीने घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमला यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, माजलगाव येथील लंकाबाई राजेभाऊ खरात या पालावर आयुष्य जगणाऱ्या महिलेला मरण यातना भोगाव्या लागत आहेत. चक्क लंकाबाई सतराव्या वेळी गरोदर होत्या, साधारण अडीच-तीन महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यात एक महिला सतरा वेळा गरोदर असतानाही ती जिवंत कशी? असे अनेक प्रश्न विविध माध्यमांमधून उपस्थित झाले होते. बीड जिल्हा आरोग्य विभागाने त्या महिलेच्या आरोग्याची हमी घेतली होती. एवढेच नाही तर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत मध्ये लंकाबाई खरात यांचा समावेश झाला कसा नाही. हा देखील प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून आरोग्य विभागाला धारेवर धरण्यात आले होते.

याच सतराव्या वेळी गरोदर असलेल्या लंकाबाई व पती राजेभाऊ खरात या दोघांनी घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे कर्नाटकामधील एका साखर कारखान्याला ऊस तोडणी ला जाण्यासाठी मुकादमाकडून उचल घेतली. आज स्थितीत देखील लंकाबाई माजलगावला म्हणजे आपल्या गावावर नाहीत. त्या ऊस तोडणीसाठी कर्नाटकात आहेत. माजलगाव ते कर्नाटक असा प्रवास ट्रॅक्टरमधून केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आदळे बसले व त्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या फडात जाईपर्यंत लंकाबाई खरात यांचे सतरावे पोटातील मुलगी पोटातच मृत झाली असून सध्या ती कर्नाटकामध्ये एका साखर कारखान्यावर ऊस तोडणीचे काम करत असल्याचे सत्यभामा सौंदरमल म्हणाल्या...

जोपर्यंत माजलगाव मध्ये होती तोपर्यंत आमचे लक्ष होते- सत्यभामा सौंदरमल

अलकाबाई खरात या माजलगाव येथील रहिवासी आहेत. शहराजवळच पाल ठोकून त्यांचे संपूर्ण कुटुंब राहत असे, तीन महिन्यापूर्वी त्या 17 व्या वेळी गरोदर असल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर मी लंकाबाई च्या आरोग्याची काळजी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने घेतली. मात्र पंधरा दिवसांपूर्वी लंकाबाई व तिचे संपूर्ण कुटुंब ऊसतोडणीसाठी कर्नाटकामध्ये गेल्यामुळे तिचा व माझा संपर्क तुटला. माजलगाव ते कर्नाटक या दरम्यानचा प्रवास ट्रॅक्टरमधून केला परिणामी लंकाबाई च्या पोटातील मुलगी मृतावस्थेत जन्माला आली असल्याची घटना साधारणता आठ दिवसापूर्वी घडली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी दिली.
*****
सोबत- सत्यभामा सौंदरमल( सामाजिक कार्यकर्त्या) यांचा बाईट अपलोड करत आहे.

Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.