ETV Bharat / state

Shani Mandir In Beed : शनीचे साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ बीड जिल्ह्यात, असा आहे इतिहास...

शनि देवस्थानाच्या साडेतीन पीठांपैकी एक शनी मंदिर बीड शहरात आहे. देशभरातून शनिभक्त इथे दर्शनाला येत असतात. विक्रमादित्य राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे. जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती मानली जाते.

author img

By

Published : Feb 10, 2023, 10:45 PM IST

Shani Mandir In Beed
बीडमधील शनि देवस्थान
शनिचे साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ असलेले बीडमधील शनि देवस्थान

बीड : जिल्हा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक घटना या बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. शनिदेवाच्या साडेतीन पीठांपैकी एक शनी मंदिर बीड शहरात आहे. उज्जैन, नांदगाव, राक्षसभुवन हे तीन आणि बीडमधील शनी देवस्थान अर्धे असे साडेतीन पीठ आहेत. विक्रमादित्य राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी दर शनी अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात विशेष म्हणजे स्वयंभू मूर्ती असून त्याचे धार्मिक महत्त्व अधिक आहे. वैशाख अमावास्या शनैश्चर जयंती म्हणून साजरी केली जाते. दरम्यान, यावेळी महाप्रसादाचे वाटप देखील केले जाते.

शनीचे महत्त्व : उज्जैनच्या विक्रमादित्य राजाला साडेसाती लागली होती. साडेसात वर्षातील शेवटचे अडीच वर्ष विक्रमादित्य राजा या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यावेळेस त्या विक्रमादित्य राजांनी या ठिकाणी घाण चालवलेला होता. साडेसातीच्या काळातील गेलेले राज वैभव शेवटच्या क्षणी शनि महाराजांनी दर्शन देऊन त्यांचे पूर्ववत करून दिले. विक्रम आदित्य राजांना स्वयंदर्शन देऊन साडेसातीतून मुक्त केल्याचे हे स्थान आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

असा आहे इतिहास : बीडमधील हे शनी मंदिर स्थान भारतातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ आहे. संपूर्ण देशभरातून भाविक या शनि देवस्थानी दर्शनासाठी येत असतात. आपल्याकडे शनि देवस्थानाची जी साडेतीन पीठे आहेत त्यापैकी उज्जैन, नांदगाव, राक्षसभुवन हे तीन आणि बीडमधील शनी देवस्थान अर्धे असे साडेतीन पीठ आहेत. चंपावती नगरीतील हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. विक्रमादित्य राजांना जी साडेसाती लागली होती, त्या साडेसात वर्षांमध्ये अडीच वर्ष या चंपावती नगरीमध्ये काढली. आणि त्यांनी जो घाना चालवला आहे, तो शनीच्या पाठीमागच्या बाजूला आहे. विक्रमादित्य राजा ज्यावेळेस या ठिकाणी राहत होता, त्यावेळेस त्यांनी जी काम केली आहेत, त्याच्या खुणा आजही या ठिकाणी जिवंत आहेत.

शनि मंदिराची वैशिष्ट्य : शनि मंदिर अध्यक्ष रामनाथ खोड यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले की, बीड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि अनेक वास्तू आणि मंदिरे आहेत त्यापैकी हे एक शनी मंदिर आहे भारतातल्या साडेतीन पीठांपैकी एक अर्धपीठ आहे. बीड शहराला पूर्वी तामनिंदापूर नंतर चंपावती नगर, त्यानंतर भीर आणि पुन्हा बीड असे चार नावे पडलेली आहेत. चार नावांपैकी चंपावती नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमध्ये हे शनी मंदिर देवस्थान आपल्या साडेतीन पीठांपैकी एक अर्धपीठ आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार यापूर्वी झालेला नव्हता मात्र, भक्तगणांच्या माध्यमातून याचा जीर्णोद्धार झालेला आहे.

शनि देवस्थानाची दिनचर्या : शनिभक्त प्रा. तुकाराम वाघमारे यांनी सांगितले की, चंपावती नगरीमध्ये साडेतीन पिठापैकी एक म्हणून ओळखला जाणारा शनी मंदिर चंपावती नगरीमध्ये आहे. जे साडेतीन पीठ आहेत त्यापैकी अर्धपीठ हे बीडमध्ये आहे. अनेक लोकांना हे मंदिर माहित नव्हते. मात्र, आता मंदिराचा विकास झाल्यामुळे आता बऱ्याच लोकांना या मंदिराविषयी माहिती झाली आहे. साडेतीन पीठांपैकी ओळखल्या जाणाऱ्या या अर्धपीठ शनि देवस्थानाचे दर्शन घेण्याचे आवाहन ईटीव्हीच्या भारतच्या माध्यमातून त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, दर शनिवारी या ठिकाणी महाप्रसाद होतो तर प्रत्येक शनि आमावस्याला शनि जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे मोठी यात्रा भरते त्याचबरोबर दररोज या ठिकाणी आरती होते तसेच महाप्रसादही मोठ्या प्रमाणात केला जातो. भक्तगणांना समाधानी करणारे शनी म्हणून या शनीची ओळख संपूर्ण राज्यात आहे. मंदिर सकाळी 6 वाजायच्या सुमारास दर्शनासाठी खुले केले जाते. दुपारी बारा वाजायच्या सुमारास आरती होते. प्रामुख्याने खिचडी हा प्रसाद देवाला दाखवला जातो. संध्याकाळी देखील आरती पार पडते. आरतीनंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास मंदिर दर्शनासाठी बंद केले जाते.

देवस्थानी इच्छा पूर्ण होतात : महिला शनि भक्त छाया यादव म्हणाल्या की, आम्ही गेले दहा वर्षापासून या ठिकाणी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत आहोत. आमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या या ठिकाणी पूर्ण होतात. जीवनात अनेक अडचणी येतात त्यावेळेस आपण घरच्या वरिष्ठ मंडळींचा आधार घेतो, मात्र त्यांच्याकडूनही त्याचे निरासन जर नाही झाले तर आम्ही थेट शनी मंदिरात येऊन शनि देवाची भक्ती करतो, त्यामुळे आमच्या इच्छा इथे पूर्ण होतात.

हेही वाचा : Temple Without Roof: राजस्थानातही आहे शनि शिंगणापूर प्रमाणे बिना छताचे मंदिर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.