ETV Bharat / state

एचआरसीटी स्कोअर १६ आणि ऑक्सिजन पातळी ६५पर्यंत उतरलेली, तरीही ९५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात - अंबाजोगाई डॉ. सुहास यादव न्यूज

अंबाजोगाईमध्ये ९५ वर्षीय आजोबांनी एचआरसीटी स्कोअर १६ आणि ऑक्सिजन पातळी ६५ पर्यंत उतरलेली असताना देखील कोरोनावर मात केली आहे.

अंबाजोगाई कोरोना न्यूज
एचआरसीटी स्कोअर १६ आणि ऑक्सिजन पातळी ६५ पर्यंत उतरलेली तरीही ९५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात
author img

By

Published : May 29, 2021, 6:57 PM IST

अंबाजोगाई - वय ९५ वर्षे.. त्यात कोरोनाची लागण झाली. एचआरसीटी स्कोअर १६ वर गेलेला तर ऑक्सिजन पातळी ६५पर्यंत उतरलेली… काहीही झाले तरी झेपेल तेवढे उपचार करून वडिलांना या आजारातून बाहेर काढायचं यासाठी मुलांनी त्यांना अंबाजोगाईच्या सीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतर ते ९५ वर्षीय आजोबा अवघ्या सात दिवसात कोरोनावर मात करून घरी गेले.

आवश्यक बाबींनी रुग्णालय सज्ज
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. ही वाढती संख्या शासकीय रुग्णालयांना झेपणारी नसल्याने शासनाने कोरोना उपचाराचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या खासगी रुग्णालयांनाही उपचाराची परवानगी देण्यात आली. अंबाजोगाई येथील डॉ. सुहास यादव यांचा शासकीय रुग्णालयातील कोरोना उपचाराचा अनुभव लक्षात घेता त्यांचे सीएम हॉस्पिटल देखील कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. कोविड आणि नॉन-कोविड रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था, आयसीयू तसेच ऑक्सिजन बेड आणि तज्ज्ञ स्टाफ या सार्व आवश्यक बाबींनी हे रुग्णालय सज्ज आहे. आजवर अनेक रुग्ण या हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

अवघ्या सात दिवसात कोरोनावर मात

मागील आठवड्यात या रुग्णालयात एका ९५ वर्षीय आजोबांना दाखल करण्यात आले. एचआरसीटी स्कोअर १६ असल्याने आणि ऑक्सिजन पातळी ६५ पर्यंत उतरलेली असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झालेली होती. काहीही उपचार करा, पण आमच्या वडिलांना वाचवा, असे म्हणत मुलांनी त्यांना सीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. सुहास यादव यांच्या अनुभवाचा वापर करून आणि डॉ सचिन भावठानकर यांच्या नवीन अत्याधुनिक पद्धतीने या रुग्णावर उपचार करण्यात आले. लवकरच याचे चांगले परिणाम दिसून आले. डॉक्टरांचे निरीक्षण, योग्य उपचार पद्धती आणि स्वतःची इच्छाशक्ती या जोरावर त्या आजोबांनी अवघ्या सात दिवसात कोरोनावर मात केली. रुग्णालयाच्या वतीने त्यांना सन्मानाने घरी सोडण्यात आले. यानिमित्ताने रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

उपचारांना चांगला प्रतिसाद दिला
आजोबांचे वय जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना आमच्या निरीक्षणाखाली ठेवून औषधोपचार केले. त्यांनी औषधी व जेवण वेळेत करुन उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. सात दिवसात त्यांची प्रकृती ठणठणीत बरी झाली. आजोबा बरे झाल्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद झाला. आमच्याकडे सर्वच रुग्ण लवकर बरे व्हावेत. यासाठी आमचे कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहे, असे डॉ. सुहास यादव यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.