ETV Bharat / state

अंबेजोगाईच्या रुद्रवार दाम्पत्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार

author img

By

Published : Apr 15, 2021, 4:41 PM IST

दोघांच्याही शरीरावर अनेक जखमा आहेत. त्यामुळे मृतदेह दीर्घकाळ ठेवता येणार नाही, असेही नान्नापानेनी यांनी सांगितले आहे.

रुद्रवार
रुद्रवार

परळी (बीड) - अमेरिकेतील अर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या बीड येथील बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार यांच्या पार्थिवावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुद्रवार दाम्पत्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 32 वर्षीय बालाजी रुद्रवार आणि 30 वर्षीय आरती रुद्रवार यांचा मृतदेह गेल्या बुधवारी न्यूजर्सीतील राहत्या अपार्टमेंटमध्ये चाकूने भोसकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत बसल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी या घटनेबद्दल पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बालाजी आणि आरती यांचे भाऊ अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मोहन नान्नापानेनी यांनी दिली. नान्नापानेनी हे अमेरिकेत सामाजिक कार्य करतात. नान्नापानेनी हे बालाजी यांच्या कन्येसाठी आर्थिक मदत गोळा करत आहेत. बालाजी आणि आरती यांच्या भावांना अमेरिकेत वास्तव्यासाठी निधीची नितांत गरज आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. नान्नापानेनी हे 2017पासून संकटात असेलल्या कुटुंबांना मदत करण्याचे काम करत आहेत.

आम्ही अंत्यसंस्कार अधिक काळ रोखू शकत नाहीत. बालाजी आणि आरतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. कारण त्यांच्या कुटुंबीयांनीही लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले आहे. कारण दोघांच्याही शरीरावर अनेक जखमा आहेत. त्यामुळे मृतदेह दीर्घकाळ ठेवता येणार नाही, असेही नान्नापानेनी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-भय इथले संपत नाही... नागपुरात २४ तास जळतायेत चिता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.