परळी (बीड) : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील नागापूर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या बांधकामासाठी १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून, या शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळा बांधणे हे मंदिर उभारण्याइतकेच पवित्र व राष्ट्रीय कार्य असून, यासाठी धनंजय मुंडे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य, शिक्षण यासह पायाभूत सुविधांच्या निर्माणासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मा. मुंडे साहेब यांच्या माध्यमातून निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन यावेळी बोलताना अजय मुंडे यांनी केले.
यावेळी अजय मुंडे यांच्यासह नागापूरचे सरपंच मोहनदादा सोळंके, वाहेद शेठ,शाहेद खान, अच्युत मुरकुटे, भगवान मुंडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
सदर माध्यमिक शाळेच्या दोन मजली इमारतीमध्ये ४+४ खोल्यांचे बांधकाम, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह असे एकूण एक कोटी रुपये खर्चून बांधकाम करण्यात येणार असून, या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. हे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने व जलदगतीने पूर्ण करण्याबाबत सूचना अजय मुंडे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.