ETV Bharat / state

Zilla Parishad Beed : जिल्हा परिषदेच्या 52 बोगस दिव्यांग शिक्षकांवर होणार कार्यवाही - Handicapped Teachers

बीड जिल्ह्यात दिव्यांग शिक्षक फेर तपासणी करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 148 पैकी 52 शिक्षक बोगस प्रमाणपत्र लावून झाले होते. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या सर्वच शिक्षकांची तपासणी केली होती आणि याच तपासणीत 52 बोगस शिक्षकांवर निलंबनाची कारवाई अटळ आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यामुळे खऱ्या दिव्यांगांना मिळणार न्याय आहे. तर फेर तपासणीत संपूर्ण गौडबंगाल उघड झाले आहे.

Zilla Parishad in Beed district
बोगस दिव्यांग 52 शिक्षकांवर होणार कार्यवाही
author img

By

Published : Jan 20, 2023, 12:39 PM IST

जिल्हा परिषदेच्या बोगस दिव्यांग 52 शिक्षकांवर होणार कार्यवाही

बीड : बीड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या बदल्यामध्ये 336 शिक्षक संवर्ग, एक दिव्यांग व दुर्ग दुर्धर आजारा असल्याचे शिक्षकांनी सांगितले होते. यातील 223 शिक्षकांचे आजार दिव्यांगत्व आणि त्यांच्याकडील प्रमाणपत्राची पुनर तपासणी आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात करण्यात आली. यातील 148 शिक्षकांचा अहवाल सीईओ अजित पवार यांच्याकडे प्राप्त झाला. यातील 52 शिक्षक बोगस निघाले आहेत. याची जर टक्केवारी काढली तर जवळपास 30 टक्के शिक्षक या अहवालात बोगस निघाले आहेत.

दिव्यांगाला न्याय मिळणार : मुख्य कार्यकारी अजित पवार यांनी दिव्यांग बोगस शिक्षक मोहिमेला खऱ्या अर्थाने यश मिळवून दिले आहे. त्यामुळे खऱ्या दिव्यांगाला न्याय मिळणार आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत पंधरा हजार शिक्षक आहेत. यातील फक्त दीड हजार शिक्षकांचीच तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 336 शिक्षक निघाले आहेत. यातील दोनशे शिक्षकांची फेर तपासणी करण्यासाठी आंबेजोगाई येथील स्वराती या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले होते. त्यातील 52 शिक्षक बोगस निघाल्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आणि या शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अनेक प्रकार उघडकीस : जिल्ह्यात विविध भागात अनेक धडधाकट मंडळींनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या जागा, बस प्रवासात सूट, मध्य व इतर लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे खऱ्या दिवंगत दिव्यांगावर अन्याय होत होता. जिल्ह्यात साधारण 12 हजार अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर आहेत. संवर्ग एकच्या बदल्यामध्ये दीड हजारात तब्बल 336 लोकांकडे अशी दिव्यांग व दुर्धर आजाराची प्रमाणपत्र आढळले आहेत. त्यातील दोनशे प्रमाणपत्राची फेर तपासणी आंबेजोगाईच्या रुग्णालयात चौकशीसाठी पाठवण्यात आले आणि याच आधारे 52 शिक्षक बोगस आढळून आले. आता त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही अटळ आहे.

अधिकारी म्हणतात : 148 पैकी 52 केसेसचा आंबेजोगाई मेडिकल कॉलेज कडून अहवाल प्राप्त झालेला आहे. आज त्यांना आम्ही 11.00 वाजता त्यांना हेरिंगला बोलवलेले आहे. हेअरिंगमध्ये आंबेजोगाई मेडिकल कॉलेजचा अहवाल आलेला आहे. तो त्यांना देणार आहेत, त्याच्यावर त्यांचा खुलासा मागून त्यांच्यावर नक्कीच कार्यवाही करण्यात येणार आहे.

हेही वाचा : BSE Odisha Results ओडिशा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.