ETV Bharat / state

Satish Jarkivali Controversial Statement : सतीश जारकीवली यांनी हिंदू विरोधी केलेल्या वक्तव्याचा भाजपाकडून जाहीर निषेध - controversial statement argued by bjp in beed

( Satish Jarkivali Controversial Statement ) नांदेड येथे काँग्रेस समितीचे कार्यध्यक्ष सतीश जारकीवली यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी याकरिता त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 11, 2022, 5:47 PM IST

नांदेड : काँग्रेस समितीचे कार्यध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदू विरोधी वक्तव्य ( Satish Jarkivali Controversial Statement ) केले आहे. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करत धर्मवीर उपाधीसाठी मराठी लायक नाहीत, असेही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सतीश जारकीवली यांच्यावरील वक्तव्याचा बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी याकरिता त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

निवेदनात काय म्हटलंय - अखंड जगाच्या संस्कृतीत हिंदू संस्कृतीचे स्थान उच्च दर्जाचे आहे. हिंदू हा शब्द केवळ धर्म म्हणून न्हवे तर, एका सहिष्णू धर्माचा प्रतिनिधित्व करणारा धर्म आहे. जगभरातील लोकांच्या ओठावर रुळलेला आणि करोडो लोकांची अस्मिता असणारा हिंदू शब्द आणि धर्म आहे. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे जगातील स्वाभिमानी लोकांचे आदर्श आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आणि इतिहास युवकांसाठी आदर्श प्रेरणास्थान आहे. गौरवशाली इतिहास निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीबद्दल केलेले अपमानास्पद वक्तव्य निंदनीय आहे.

कारवाई करण्याची मागणी - सतीश जारकीवली यांच्या हिंदुविरोधी द्वेषातून केलेल्या वक्तव्यामुळे समस्त हिंदू धर्मीय व शिवप्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड अशांतोष निर्माण झाला आहे. राजकीय हेतूपोटी समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या अशा समाजकंटकांचा शासनाने बंदोबस्त केला पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी आपल्याद्वारा शासनाला करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.