बीड - राज्यसह देशांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा निर्मूलनाचे ( Elimination of superstitions ) काम केले जात आहे, मात्र पारधी समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धा मानली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. देश एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाकडे झेप घेत असतानाच अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत.अशीच एक घटना पारधी समाजात पाहायला मिळत आहे, त्यामुळे समाजातील अशा प्रथा बंद व्हायला पाहिजेत अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
दगडावर आपटून कुत्र्याला मारले- पारधी समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धेच्या बाबतीत मागच्या वेळेसही मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये एका महिलेला चारित्र्याच्या संशयावरून तेलातून पैसा काढायला लावला होता, हा व्हिडिओ मला पारधी समाजाकडून आलेला आहे, तो व्यक्ती देवांना शिव्या देऊन देवाला साकडे ( Poured alcohol on God ) घालत आहे. तसेच त्यांने दगडावर आपटून कुत्र्याला ( Hit stone and killed dog ) मारले आहे, मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता म्हणून ही पारधी समाजातील अंधश्रद्धा लोकांच्या समोर यावी. त्यांच्यातीलच कार्यकर्त्यांनी भूमिका घेऊन या अंधश्रद्धा मोडीत काढल्या पाहिजेत अशी भूमीका अशोक तांगडे कार्यकर्ते अंनिस यांनी व्यक्त केली आहे.
एखाद्या शत्रूला मारण्यासाठी कुत्र्याचा बळी - पारधी समाज एखाद्या शत्रूला मारण्यासाठी कुत्र्याचा बळी घेतो. ह्या पद्धतीची अंधश्रद्धा मला पाहायला मिळाली. मला त्याचं वाईट वाटलं. त्याला कुठेतरी पाय बंद घातला पाहिजे. हा व्हिडिओ जनमानसापर्यंत यावा म्हणून मी मी माझी भूमिका मांडली, आपण पारधी समाजाच्या कार्यकर्त्यांना, पारधी समाजाला, सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. पण, अंतर्गत जी अंधश्रद्धा आहे त्याचे अंधश्रद्धा निर्मूलन झाल्याशिवाय पारधी समाजात सुधारणा होणार नाही. असे ते तांगडे म्हणाले. समाज शिकला तरी त्या देवीसाठी नवस बोलून बोकड कापण्यासाठी पैसा जात असेल तर तर शिकलेल्यामध्ये आणि न शिकलेल्यामध्ये काय फरक? त्याचबरोबर बाहेर आणि अंतर्गत लढा या दोन्ही लढाया पारधी समाजाने एकत्र लढल्या पाहिजेत, त्यामुळे हा पारधी समाजाचा व्हिडिओ आहे तो मी स्वतः समाज माध्यमावर व्हायरल करत असल्याचे तांगडे यांनी सांगितले.
तत्त्वशील कांबळे अंनिस कार्यकर्ते हे यांनी सांगितले की, आपला भारतीय समाज हा अंधश्रद्धेने बरबटून गेलेला आहे, घटना पाहत आहोत की दिल्ली येथील दोन महिन्याच्या बालकाला नरबळी देण्यासाठी एका महिलेने चक्क त्याचं अपहरण केलं त्याचं कारण असं आहे की त्या महिलेचे वडील एक्सपायर झाले होते. त्या वडिलांना जिवंत करण्यासाठी त्या दोन महिन्याच्या बालकाचा बळी द्यायचा होता ती केवढी मोठी अंधश्रद्धा आहे.
कायद्याचे रक्षकांनाच नाही नाज्ञ - आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले की पारधी समाजाचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्याच्यामध्ये पण खूप मोठी अंधश्रद्धा आहे, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने देशांमध्ये सर्वप्रथम 2013 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला. त्याच्यामध्ये आपला समाज जनजागृती झालेली नाही. याच्यामध्ये पोलीस असतील, वकिल असतील जे कायद्याचे रक्षण करतात त्यांनाही याबाबतीत ज्ञान नाही.
कायद्याच्या रक्षकांना प्रशिक्षण दिले पाहिजे - जे प्रशासन आहे त्यांना सुद्धा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, जर हा कायदा सर्वांना माहीत झाला तर याचा कुठेतरी वचक राहिल. सामाजिक राजा नरबळी, पशु हत्या , ज्या जुन्या रूढी परंपरा संपल्या जातील अशा आशा त्यांनी व्यक्त केली.