ETV Bharat / state

गर्भलिंग उघड केल्याप्रकरणी डॉक्टरला दोन वर्षांची शिक्षा; मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांचा निकाल - डॉ. राजेंद्र ढाकणे

गर्भलिंग करण्यास शासनाने बंदी घातली असताना बीडमधील डॉ. राजेंद्र ढाकणे याने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करीत एका महिलेच्या गर्भातील बाळाचे लिंग उघड केल्याप्रकरणी बीडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यानुसार डॉ. ढाकणेला २ वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.

गर्भलिंग उघड केल्याप्रकरणी डॉक्टरला दोन वर्षची शिक्षा

author img

By

Published : Jan 8, 2020, 8:00 AM IST

बीड - महिलेच्या गर्भातील बाळाचे लिंग उघड केल्याप्रकरणी बीडमधील डॉ. राजेंद्र ढाकणेला गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार बीडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. तसेच या संदर्भात मेडिकल कौन्सिलला कळवण्याचे निर्देश बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत.

बीड जिल्ह्यात २०१०-१२ या कालावधीत गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्या होत्या. जिल्ह्याचा स्त्री जन्मदरही कमालीचा घटला होता, त्यावेळी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या प्रकाराविरुद्ध आघाडी उघडली होती.

त्यातच ऑक्टोबर २०११ मध्ये दिल्लीच्या समितीने डॉ. राजेंद्र ढाकणे याच्या सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी केली. यात, अनियमितता आढळून आल्याने समितीने जिल्हा शल्य चिकित्सकांना सविस्तर तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली. त्यावेळी त्याठिकाणी सोनोग्राफी केलेल्या महिलांची माहिती विहित नमुन्यात ठेवली नसल्याचे समोर आले. तसेच एका महिलेच्या नावासमोर सांकेतिक शब्दात गर्भलिंग निदानाचा उल्लेख आढळला होता. त्यानुसार डॉ. राजेंद्र ढाकणेविरुद्ध बीडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - बीडमध्ये विषबाधा झाल्याने युवकाचा मृत्यू, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा घरच्यांचा आरोप

हे प्रकरण मुख्य न्याय दंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्यासमोर चालले. यात डॉ. गौरी राठोड यांची साक्ष महत्वाची ठरली. अखेर न्यायालयाने या प्रकरणात डॉ. राजेंद्र ढाकणे यास दोषी ठरवत विविध कलमांखाली २ वर्षाची सक्तमजुरी आणि १२ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने बी. एस. कदम यांनी काम पाहिले.

हेही वाचा - बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून धनंजय मुंडेंनी स्वीकारला खात्याचा पदभार

Intro:गर्भलिंग उघड केल्याप्रकरणी डॉक्टरला दोन वर्षची शिक्षा; मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांचा निकाल

बीड- गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करीत एका महिलेच्या गर्भातील बाळाचे लिंग उघड केल्या प्रकरणी बीडमधील डॉ. राजेंद्र ढाकणेला गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार बीडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. तसेच या संदर्भात मेडिकल कौन्सिलला कळवण्याचे निर्देश बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत.
बीड जिल्ह्यात२०१० -१२ या कालावधीत गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रुण हत्येच्या मोठ्याप्रमाणावर घटना उघडकीस आल्या होत्या.जिल्ह्याच्या स्त्री जन्मदर कमालीचा घटला होता, त्यावेळी तत्कालीन जिल्हा शकल्या चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या प्रकाराविरुद्ध आघाडी उघडली होती.
त्यातच ऑकटोबर २०११ मध्ये दिल्लीच्या समितीने डॉ. राजेंद्र ढाकणे याच्या सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी केली होती, यात ,अनियमितता आढळून आल्याने समितीने जिल्हा शल्य  चिकित्सकांना सविस्तर तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली त्यावेळी त्याठिकाणी सोनोग्राफी केलेल्या महिलांची माहिती विहित नमुन्यात ठेवली नसल्याचे समोर आले तसेच एका महिलेच्या नावासमोर सांकेतिक शब्दात गर्भलिंग निदानाचा उल्लेख आढळला होता. त्यानुसार डॉ. राजेंद्र ढाकणे  विरुद्ध बीडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मुख्य न्याय दंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्यासमोर चालले . यात डॉ. गौरी राठोड यांची साक्ष महत्वाची ठरली. अखेर न्यायालयाने या प्रकरणात डॉ. राजेंद्र ढाकणे यास दोषी ठरवत विविध कलमाखाली दोन वर्षाची सक्तमजुरी आणि १२ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने बी. एस. कदम यांनी काम पहिले.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.