ETV Bharat / state

बीडमध्ये अनोखा उपक्रम; एकाचवेळी ८३६ कन्यारत्नांचे सामूहिक नामकरण

author img

By

Published : Jan 5, 2020, 8:02 PM IST

आज सकाळी ११ वाजता सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत जन्मलेल्या तब्बल ८३६ मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा पार पडला. आणि प्रतिष्ठानाने स्वत:च यापूर्वी केलेल्या विक्रमाला मागे टाकत नवा विक्रम केला.

beed
नामकरण सोहळ्याचे दृश्य

बीड- स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या १६ व्या राज्यस्तरीय किर्तन महोत्सवात कन्यारत्नांच्या सामूहिक नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात एकाचवेळी तब्बल ८३६ चिमुकलींचे नामकरण करण्यात आले. यावेळ प्रतिष्ठानाने गेल्या वर्षीचा कन्या नामकरण सोहळ्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

सामूहिक कन्या नामकरण सोहळ्याचे दृश्य

यंदा तिसर्‍या वर्षीही ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालय प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकारातून आज सकाळी ११ वाजता सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत जन्मलेल्या तब्बल ८३६ मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा पार पडला. आणि प्रतिष्ठानाने स्वत:च यापूर्वी केलेल्या विक्रमाला मागे टाकत नवा विक्रम केला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रीतमताई मुंडे, ‘वंडर बुक रेकॉर्ड’ च्या भारतातील हैद्राबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. प्रतिभा थोरात, आसाराम खटोड यांची उपस्थिती होती. दरम्यान, स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून बीडची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख झाली असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले आणि खटोड प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

खा.डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्याची खासदार म्हणून नाही तर तुमची बहिण म्हणून मी इथे आली आहे. आम्ही आलो म्हणून या कार्यक्रमाचे महत्व वाढत नाही तर आम्ही इथे आल्याने आमचे महत्व वाढले आहे. जिल्ह्यातील स्त्री भ्रुण हत्येचा बदनामीचा डाग धुवून काढण्यापासून ते स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून आता बीडची ओळख झाली आहे. यासाठी खटोड सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकारही महत्वाचा ठरत आहे. ३०१ मुलींपासून आता ८३६ मुलींचे सामूहिक नामकरण खटोड प्रतिष्ठानने करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. मुलींची आत्या नव्हे तर मुलींची मावशी म्हणून सातत्याने यायला आवडेल. मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी सर्वच घटक जागरुक आहेत. जिल्ह्याची खासदार म्हणून मला दोन वेळेस एक मुलगी म्हणून तुमचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. हे मी माझे भाग्य समजते. मुला-मुलींवर चांगले संस्कार करा, मुलींबरोबरच मुलांचाही सन्मान कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. खटोड यांनी किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवले, अशा शब्दात त्यांनी खटोड प्रतिष्ठानचे कौतुक केले.

असा पार पडला नामकरण सोहळा

रविवारी सकाळच्या सत्रात किर्तन महोत्सवात एकाच मांडावाखाली तब्बल ८३६ मुलींचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम सर्वांचे डोळे दिपवणारा ठरला. मुलीच्या आत्यांनी मुलींना कानात सूचवल्याप्रमाणे नामकरण झाले. आपल्या मुलीचा इतका सुंदर आणि अनोखा नामकरण सोहळा पार पडत असताना मुलींच्या आईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. या नामकरण सोहळ्यास मुलींचे कुटुंबीय आणि नातेवाईकही आवर्जून उपस्थित राहिले होते. ऐरवी चार भिंतीच्या आत होणार्‍या बारशाला घरातील लोक आणि आप्तेष्ट उपस्थित असतात. बीडमध्ये मात्र हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मुलीचा नामकरण सोहळा पार पडल्याने या मातांचा आनंद गगणात मावत नव्हता. सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय किर्तनाकार भरतबुवा रामदासी यांनी केले. किर्तन महोत्सवात रविवारी संपन्न झालेल्या कन्यारत्नांच्या सामूहिक नामकरण सोहळ्याप्रसंगी औरंगाबाद येथील सौ. अनघा संदीप काळे व गौरव पवार यांचा संगीतमय बारशाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी त्यांनी ‘मेरी घर आयी नन्ही परी’, ‘मोगरा फुलला’ ‘छोटी सी नन्ही सी प्यारी सी आयी कोई परी’ ही आणि इतर बारशाची गीते सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.

गोल्डन बुक व वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

किर्तन महोत्सवातील या सामूहिक नामकरण सोहळ्याची ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या लंडन स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेसह गोल्डन बुक ऑफ रेकार्ड या संस्थेने नोंद घेतली आहे. ‘वंडर बुक रेकॉर्ड’ चे भारतातील हैद्राबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम यांनी या नामकरण सोहळ्याचे निरीक्षण केले. आशिया खंडात असा उपक्रम राबवणार्‍या स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानची यंदा तिसर्‍यांदा आंतरराष्ट्रीय विक्रमात नोंद झाली आहे. तसेच गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. याप्रसंगी मुलगा-मुलगी असा भेद कोणीही करू नये. मुलगा घराचे नाव करतो. मात्र, मुलगी माहेर आणि सासर दोन्ही घराचे नाव मोठे करणारी असते. गौतम खटोड व त्यांच्या प्रतिष्ठानचे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे, असे डॉ. स्वर्णश्री गुराम म्हणाल्या.

सामाजिक उपक्रमातून समाधान- गौतम खटोड

बीड जिल्ह्यात सन २०१०-११ मध्ये १ हजार मुलांमागे ८१० मुली होत्या. मात्र, आरोग्य यंत्रणेने बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाची चांगली अंमलबजावणी केली. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले. त्यामुळे, आज २०१८-१९ मध्ये मुलींचा जन्मदर १ हजार मुलांमागे ९६१ इतका आहे. हे मोठे यश आहे. एकाच मांडवात मुलींच्या सामूहिक नामकरणाचा सोहळा घेताना समाधानाची प्राप्ती होते, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या कार्याचा सन्मान- डॉ.अशोक थोरात

मुलींच्या नामकरणाचा हा उपक्रम मागील तीन वर्षापासून राबविला जात आहे. या उपक्रमात मला साक्षीदार होता आले. आणि याच प्रतिष्ठानकडून आरोग्य विभागातील सर्व घटकांनी केलेल्या चांगल्या कार्याचा हा सन्मान असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. माझे रुग्णच माझे देव आहेत. गौतम खटोड यांनी जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षाला स्वत:हून पुढाकार घेत बेड, गाद्या देवून सुविधा उपलब्ध करून दिल्या. सीटीस्कॅन मशीन सुरू करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले. स्त्री भ्रुण हत्येमुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर वाढला आहे, असे डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

मातांसह कन्यारत्नांचा असा झाला सन्मान

खटोड प्रतिष्ठानच्या वतीने सामूहिक मुलींच्या नामकरण सोहळ्यात मुलीच्या आईचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले. मुलींच्या आईचे साडी-चोळीची भेट देवून हळदी-कुंकू करत स्वागत सत्कार करण्यात आले. तर मुलींना पाळणा, डेस, ड्रायफ्रुट, खेळणी, भेट स्वरुपात देण्यात आल्या.

हेही वाचा- बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर; अध्यक्ष पदाचा निकाल न्यायालयाच्या निकाला नंतरच

Intro: बीडमध्ये अनोखा उपक्रम; एकाचवेळी 836 कन्यारत्नांचे सामुहिक नामकरण

बीड - खटोड प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचा भव्य सभामंडप...एकाचवेळी तब्बल 836 पाळण्यात बसवलेल्या चिमुकल्या...व्यासपीठावरुन गायिली जाणारी बारशाची गीते...अन् गर्दीने फुलून गेलेल्या सभामंडपात नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई...हे चित्र बीडकरांनी दुसर्यांदा अनुभवले ते येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या 16 व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आयोजीत कन्यारत्नांच्या सामुहिक नामकरण सोहळ्यात..! यंदा तिसर्‍या वर्षीही ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालय प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकारातून रविवार दि.5 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वा. सप्टेंबर ते डिसेंबर 2019 या कालावधीत जन्मलेल्या तब्बल 836 मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा पार पडला. अन् प्रतिष्ठानने स्वत:च यापूर्वी केलेल्या विक्रमाला मागे टाकत नवा विक्रम केला. दरम्यान स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून बीडची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख झाली असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी बीडच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी करत खटोड प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतूक केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, ‘वंडर बुक रेकॉर्ड’च्या भारतातील ंहैद्राबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ.प्रतिभा थोरात, आसाराम खटोड उपस्थित होते.

खा.डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या, जिल्ह्याची खासदार म्हणून नाही तर तुमची बहिण म्हणून मी इथे आले आहे. आम्ही आलो म्हणून या कार्यक्रमाचे महत्व वाढत नाही तर आम्ही इथे आल्याने आमचे महत्व वाढले आहे. बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रुण हत्येचा बदनामीचा डाग धूवून काढण्यापासून ते स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून आता बीडची ओळख झाली आहे. यासाठी खटोड सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकारही महत्वाचा ठरत आहे. 301 मुलींपासून आता 836 मुलींचे सामुहिक नामकरण खटोड प्रतिष्ठानने करुन एक विक्रम प्रस्थापित केला आहे. मुलींची आत्या नव्हे तर मुलींची मावशी म्हणून सातत्याने यायला आवडेल, मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी सर्वच घटक जागरुक आहेत. जिल्ह्याची खासदार म्हणून मी दोन वेळेस एक मुलगी म्हणून तुमचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. मुला-मुलींवर चांगले संस्कार करा, मुलींबरोबरच मुलांचाही सन्मान कायम ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले. गौतम खटोड हे बोललेल्या सर्व गोष्टी करुन दाखवतात, त्यामुळे त्यांचे संकल्प पुर्णत्वास जात आहेत. खटोड यांनी कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवले अशा शब्दात त्यांनी खटोड प्रतिष्ठानचे कौतूक केले. खटोड कुटूंबियांच्या कार्यक्रमात सहभागी होता आले हे मी भाग्य समजते. प्रतिष्ठानच्या या उपकम्रात योगदान देण्यासाठी मी कायम सहभागी होईल अशी ग्वाही खा.प्रितम मुंडे यांनी दिली.

रविवारी सकाळच्या सत्रात कीर्तन महोत्सवात एकाच मांडावाखाली तब्बल 836 मुलींचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम सर्वांचे डोळे दिपवणारा ठरला. मुलींच्या जन्माचे असे भव्य-दिव्य स्वागत बीडकरांनी तिसर्‍यांदा अनुभवले. यावर्षी प्रतिष्ठानकडून सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत जन्मलेल्या 836 मुलींचा नामकरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी 836 मुलींचे पाळणे हलवण्यात आले. मुलीच्या आत्यांनी मुलींना कानात सूचवल्याप्रमाणे नामकरण झाले. आपल्या मुलीचा इतका सुंदर आणि अनोखा नामकरण सोहळा पार पडत असताना मुलींच्या आईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. या नामकरण सोहळ्यास मुलींचे कुटुंबीय आणि नातेवाईकही आर्वजून उपस्थित राहिले होते. ऐरवी चार भिंतीच्या आत होणार्‍या बारशाला घरातील लोक आणि आप्तेष्ट उपस्थित असतात. बीडमध्ये मात्र हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मुलीचा नामकरण सोहळा पार पडल्याने या मातांचा आनंद गगणात मावत नव्हता.सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रीय कीर्तनाकार भरतबुवा रामदासी यांनी केले. कीर्तन महोत्सवात रविवारी संपन्न झालेल्या कन्यारत्नांच्या सामुहिक नामकरण सोहळ्याप्रसंगी औरंगाबाद येथील सौ. अनघा संदीप काळे व गौरव पवार यांचा संगीतमय बारशाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी त्यांनी ‘मेरी घर आयी नह्नी परी’ ‘मोगरा फुलला’ ‘छोटी सी नन्ही सी प्यारी सी आयी परी’ हे आणि बारशाची गीते सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.

गोल्डन बुक व वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद-

कीर्तन महोत्सवातील या सामुहिक नामकरण सोहळ्याची ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या लंडन स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेसह गोल्डन बुक ऑफ रेकार्ड या संस्थेने नोंद घेतली. ‘वंडर बुक रेकॉर्ड’चे भारतातील ंहैद्राबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम यांनी या नामकरण सोहळ्याचे निरीक्षण केले. आशिया खंडात असा उपक्रम राबवणार्‍या स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानची यंदा तिसर्‍यांदा आंतरराष्ट्रीय विक्रमात नोंद झाली आहे. तसेच गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. याप्रसंगी डॉ.स्वर्णश्री गुराम म्हणाल्या, मुलगा-मुलगी असा भेद कोणीही करु नये. मुलगा घराचे नाव करतो, मात्र मुलगी माहेर अन् सासर दोन्ही घराचे नाव मोठे करणारी असते. गौतम खटोड व त्यांच्या प्रतिष्ठानचे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे.

सामाजिक उपक्रमातून समाधान -गौतम खटोड

बीड जिल्ह्यात सन 2010-11 मध्ये 1 हजार मुलांमागे 810 मुली होत्या, मात्र आरोग्य यंत्रणेने बेटी बचाओ,बेटी पढाओ या उपक्रमाची चांगली अंमलबजावणी केली. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले. त्यामुळे आज 2018-19 मध्ये मुलींचा 1 हजार मुलांमागे जन्मदर 961 वर पोहचला हे मोठे यश आहे. एकाच मांडवात मुलींच्या सामुहिक नामकरणाचा सोहळा घेताना समाधानाची प्राप्ती होते असे सागंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड म्हणाले,आरोग्य विभागाच्या या कार्याचा सन्मान म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचा ‘संत तरुणसागर महाराज सेवा गौरव’ पुरस्काराने प्रतिष्ठान सन्मान करत असल्याचे ते म्हणाले.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.आगामी काळात कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खा.प्रीतम मुंडे यांनी आमंत्रण द्यावे अशी अपेक्षाही खटोड यांनी व्यक्त केली.

आरोग्य विभागाच्या कार्याचा सन्मान -डॉ.अशोक थोरात

मुलींच्या नामकरणाचा हा उपक्रम मागील तीन वर्षापासून राबवत आहे. या उपक्रमात मला साक्षीदार होता आले अन् याच प्रतिष्ठानकडून आरोग्य विभागातील सर्व घटकांनी केलेल्या चांगल्या कार्याचा हा सन्मान असल्याचे सांगत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात म्हणाले, माझे रुग्णच माझे देव आहेत.गौतम खटोड यांनी जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षाला स्वत:हून पुढाकार घेत बेड,गाद्या देवून सुविधा उपलब्ध करुन दिल्या.सीटीस्कॅन मशीन सुरु करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले.स्त्री भु्रण हत्येमुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर वाढला आहे. मुलींच्या नामकरणाचा उपक्रम जोपर्यंत खटोड प्रतिष्ठान राबवणार आहे, तोपर्यंत खा.प्रितम मुंडे यांनी इथे उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. यापुढे जितका मुलींचा जन्मदर असेल तितक्या मुलींचे सामुहिक नामकरण करावे असे ते म्हणाले.

मातांसह कन्यारत्नांचा असा झाला सन्मान-
खटोड प्रतिष्ठानच्या वतीने सामुहिक मुलींच्या नामकरण सोहळ्यात मुलीच्या आईचे फेटा बांधून स्वागत करतानाच साडी-चोळीची भेट देवून हळदी-कुंकू करत स्वागत सत्कार करण्यात आले.तर मुलींना पाळणा, डेस, ड्रायफुड,घुगर्‍या, खेळणी,टेडी भेट स्वरुपात झाली.
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.