ETV Bharat / state

बीडमध्ये व्यापार्‍याचे 8 लाख लांबवले; तिघांविरोधात गुन्हा दाखल - neknur police beed

नाश्ता करण्यासाठी ट्रॅव्हल्स थांबली असता लातूर येथील व्यापारी आपली पैशाची बॅग गाडीत ठेवून लघूशंकेसाठी गेले होते. यावेळी मास्क बांधलेल्या दोन चोरट्यांनी गाडीतील 8 लाख रुपये चोरून नेल्याची घटना समोर आली. ही घटना बीड तालुक्यातील मांजरसुबा रस्त्यावर घडली.

8 lakh rupees stolen by thefts in beed (file photo)
बीडमध्ये व्यापार्‍याचे 8 लाख लांबवले (प्रतिकात्मक)
author img

By

Published : Oct 9, 2020, 9:05 PM IST

बीड - दोन चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचे आठ लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. ही घटना बीड तालुक्यातील मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या कन्हैय्या हॉटेलसमोर गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहेब ए. वकील पठाण (वय 30, रा. बुद्धनगर, आंबेडकर चौक लातूर) हे व्यापारी गुरूवारी विश्व नावाची ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच. 24 ए.ए.यू 3939) यामध्ये सुरतकडे जात होते. पठाण हे लातूर येथील कपड्याचे मोठे व्यापारी आहेत. ते सुरतला कपडे आणण्यासाठी जात असताना त्यांच्याजवळ नगदी 8 लाख रुपये होते. ट्रॅव्हल्स गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या कन्हैय्या हॉटेलसमोर नाश्त्यासाठी थांबली होती. यातील बहुतांश प्रवाशी नाश्त्यासाठी गेले होते. तितक्या वेळेत पठाण हे आपल्या पैशाची बॅग ठेवून लघूशंकेला गेले. या वेळेत दोन चोरट्यांनी त्यांची 8 लाख रुपयांची बॅग पळविली. परत आल्यानंतर आपले पैसे चोरीला गेल्याचे पठाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक किशोर काळे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता त्यात दोन चोरटे पैसे चोरी करत असल्याचे दिसून आले. या चोरट्यांच्या चेहर्‍यावर मास्क असल्याने त्यांचा चेहरा कॅमेर्‍यामध्ये स्पष्ट दिसत नव्हता. विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्सचा पाठलाग चोरटे लातूर येथून करत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.