बीड - एकाच कुटूंबात 23 व्यक्तींना कोरोनाची लागण झालेल्या इस्लामपूरमधून धारूरमध्ये दाखल झालेल्या 29 नागरिकांना शनिवारी मध्यरात्री आरोग्य विभागाने क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. या नागरिकांवर करडी नजर ठेवण्यात येत असून 14 दिवस त्यांच्या आरोग्याची रोज तापसणी केली जाणार आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोरोनाने कहर केला आहे. एकाच कुटुंबातील तब्बल 23 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने राज्यात खळबळ माजली होती. याच इस्लामपूरमधून 29 नागरिक शनिवारी आपल्या गावी परतण्यासाठी धारूरमध्ये दाखल झाले. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच सर्व नागरिकांना शनिवारी मध्यरात्री 1 वाजता धारूर येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यांची रोज आरोग्य तपासणी केली जाणार आहे. 14 दिवस हे नागरिक विलगीकरण कक्षात राहणार आहेत. हे सर्व नागरिक ऊसतोड कामगार असल्याचे बोलले जात आहे.