ETV Bharat / state

अंबाजोगाईत कोरोनाचे मृत्यू तांडव; 48 तासात 30 जणांचा बळी

अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्येत भर पडतच आहे.

कोरोनाचा कहर सुरूच
कोरोनाचा कहर सुरूच
author img

By

Published : Apr 26, 2021, 8:18 AM IST

अंबाजोगाई (बीड)- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडतच आहे.

सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजारपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, शेकडो रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे.

पोलीस बंदोबस्तात झाले अंत्यविधी

गेल्या 2 दिवसात 30 जणांचा मृत्यू झाला. यामुळे प्रशासन देखील हादरले आहे. या मृतदेहांवर अंबाजोगाई नगर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मृतदेहांची मोठी संख्या लक्षात घेता अंत्यविधीवेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांमुळे स्मशानभूमीतील अनावश्यक गर्दीला आळा बसला.

आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांचा ओढा अंबाजोगाईकडे

शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. हे दोन्ही सेंटर कोरोनाबाधित रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर पालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृतदेह हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

२४ तासात २३ जणांचा मृत्यू

अंबाजोगाई शहरात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये मागील २४ तासांत (२४ एप्रिलच्या दुपारी १२ ते २५ एप्रिल च्या दुपारी १२ वाजेपर्यंत) एकूण २३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती आहे. यामध्ये स्वा.रा.ती मधील २० रुग्णांचा समावेश होता. या २० मृतांपैकी एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. तर लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमधील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या सर्व रुग्णांवर नगर परिषदेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.