परळी (बीड) - पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेलेल्या परळीच्या २२ वर्षीय तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना महम्मदवाडी येथे उघडकीस आली. ही घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा चव्हाण असे मृत तरुणीचे नाव आहे.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी आली होती. पूजा लहू चव्हाण ही परळी शहरात हेवनपार्क लेन नंबर 10 मधील रहिवाशी होती. तिचे मूळ गाव परळी वैजनाथ हे होते.
हेही वाचा-पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी कोम्बिंग ऑपरेशनच्या भीतीने इराणी वस्ती झाली 'वीराण'
डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली होती-
भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत पूजा ही भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. हा घात की अपघात याबाबत चर्चा होत आहेत.
हेही वाचा-सराईत बाईक चोरटे सख्खेभाऊ सीसीटीव्ही फुटेजमुळे गजाआड; ११ दुचाकी जप्त