बीड- घरात मुलगा पाहत असलेला टीव्ही आईने बंद करत अभ्यासाला बस म्हटले, याचा राग आल्याने एका 18 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केज येथे घडली. विद्यार्थ्याने घरातील दुसर्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली.
चैतन्य अनंत कोकीळ (वय 18) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, जिल्ह्यातील केज शहरातील वकीलवाडी परिसरात अनंत कोकीळ हे कुटुंब आहे. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा चैतन्य हा अहमदनगर येथे वेद विद्यालयात गेल्या पाच वर्षांपासून वेदशास्त्राचे शिक्षण घेत होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने तो सध्या केज येथे आपल्या घरी आला होता. शनिवारी त्याने आॅनलाईन अभ्यास केला. यानंतर तो घरात झोपून टी.व्ही. पाहत असल्याने त्याच्या आईने त्याला टी.व्ही. नीट बसून पाहा व अभ्यास कर असे म्हणत टी.व्ही. बंद केला. आईने टी.व्ही बंद केल्याने चैतन्य ला राग आला. राग अनावर न झाल्याने त्याने दुसर्या खोलीत जाऊन घराचे दार बंद करत छताला असलेल्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळेनंतर चैतन्य कोठे गेला याचा शोध आई व बहीण घेत असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या बहिणीला दिसून आले. केवळ आईने अभ्यास कर म्हणत टी.व्ही. बंद केल्याने चैतन्य कोकीळ या वेद शास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळी साडे चार वाजता त्याच्यावर क्रांती नगर येथील स्मशाभूमीत चैतन्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आईने टीव्ही बंद केल्याने 18 वर्षीय मुलाची आत्महत्या; वेदशास्त्राचा होता विद्यार्थी - Argument between mother and child
आईने टी.व्ही पाहू नको, अभ्यास कर असे म्हटल्याने रागावलेल्या १८ वर्षांच्या मुलाने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वेदशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या चैतन्य कोकीळ या मुलाने आईच्या सल्ल्याने संतप्त होऊन शनिवारी आत्महत्येचे पाऊल उचलले.
![आईने टीव्ही बंद केल्याने 18 वर्षीय मुलाची आत्महत्या; वेदशास्त्राचा होता विद्यार्थी 18-year-old boy committed suicide after turning off the TV](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11271794-754-11271794-1617505743612.jpg?imwidth=3840)