बीड - मी 'नीट'ची परीक्षा दिलेली आहे. माझा मेडिकलला नंबर लागला असता. मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे माझा मेडिकलला नंबर लागू शकत नाही. अशा आशयाची चिठ्ठी लिहून बीड जिल्ह्यातील केतुरा येथे एका 17 वर्षीय मुलाने आत्महत्या केली असल्याची घटना बुधवारी समोर आली आहे.
केतुरा या आपल्या मूळ गावी शेतात तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या केलेल्या मुलाने नुकतीच बारावी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याने नीटची परीक्षा दिली होती. मृत मुलाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्याने चिट्टीमध्ये लिहिले आहे, की मी मेडिकल करून डॉक्टर होऊ इच्छितो, मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे माझा नंबर लागू शकणार नाही. समाजाला आरक्षण नसल्यामुळे माझा नंबर लागणार नाही. मी आत्महत्या केल्यानंतर तरी मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा, अशी मागणीदेखील त्याने चिठ्ठीमध्ये केली आहे. ही खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
'नीट'मध्ये माझा नंबर लागणार नाही... मराठा आरक्षणाची मागणी करत 17 वर्षीय मुलाची आत्महत्या - मराठा आरक्षण
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नीट परीक्षा देऊनही मेडिकलला नंबर लागणार नाही, अशी चिट्टी लिहून एका १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. बीडमधील केतुरा गावी ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.