ETV Bharat / state

कोरोनाव्यतिरिक्त आजारांमुळे बीडमध्ये 150 रुग्णांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष? - diseases other than coronavirus

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बीड जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढतच आहेत. अशात कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

beed
बीड
author img

By

Published : Sep 22, 2020, 5:09 PM IST

बीड - जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या सगळ्या परिस्थितीत कोरोनाव्यतिरिक्त आजारांच्या रुग्णांना मिळत असलेल्या उपचाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. न्युमोनिया, सारी याबरोबरच अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात व शासकीय रुग्णालयात उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाशिवाय इतर आजारांमुळे मागील तीन-चार महिन्यात दीडशे जणांचा मृत्यू बीड जिल्ह्यात झाला आहे. आता साडेआठ हजार पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण बीड जिल्ह्यात आहेत.

बीडचे प्रतिनिधी व्यंकटेश वैष्णव यांनी घेतलेला आढावा

कोरोना आजाराशिवाय इतर आजारांच्या रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. डॉ. ओव्हाळ यांचे म्हणणे आहे की, दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा रुग्णालयात रमेश कांबळे नावाचा व्यक्ती न्युमोनियामुळे दगावला. त्याला आवश्यक ती प्राथमिक आरोग्य सेवा मिळाली नसल्याचा आरोप डॉ. ओव्हाळ यांनी यावेळी केला आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या

बीड जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8462 एवढी असून, उपचार घेत असलेले रुग्ण 2710 एवढे आहेत. तर, बरे झालेले रुग्ण 5509 एवढे असून रुग्ण बरे होण्याचा दर 65.10 टक्के आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 243 रुग्णांचा बीड जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - बीड जिल्ह्याला दिवसाला किती लागतोय ऑक्सिजन? कशी वाढली मागणी?

हेही वाचा - बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; सोयाबीनसह इतर पिके पाण्यात, शेतकऱ्यांची पंचनाम्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.