बीड - अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती येथून दोन दिवसापूर्वी १५ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. या मुलाचा मृतदेह सोमवारी दुपारी शिवारातील एका विहिरीत आढळून आला. तो पाय घसरून विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रानबा पंडित आघाव (वय 15, रा. मरळवाडी, ता. परळी) असे मृत मुलाचे नाव आहे. आईवडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तो मूर्ती येथील मामा भगवान मारुती दराडे यांच्याकडे शिकत होता. रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास मामाच्या घरुन बाहेर गेला. पण तो घरी परतला नाही. दिवस उलटूनही तो आला नसल्यामुळे आणि सर्वत्र शोध घेऊनही तो सापडत नसल्यामुळे अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. सोमवारी दुपारी बर्दापूर पोलीस ठाण्यात रानबा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असतानाच मूर्ती शिवारातील एका विहिरीत मुलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती रानबाच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
बर्दापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रानबाची ओळख पटविली. पाणी शेंदताना रानबा विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुरुमाची विहीर असल्याने त्याचा पाय घसरला आणि विहिरीत पायऱ्या नसल्याने त्याला आधार मिळाला नसावा. परिणामी त्याचा बुडून मृत्यू झाला असा कयास आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अंबाजोगाई येथे 15 वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती येथून दोन दिवसापूर्वी १५ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. या मुलाचा मृतदेह सोमवारी दुपारी शिवारातील एका विहिरीत आढळून आला.