ETV Bharat / state

बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याने भिंतीवर सुसाईड नोट लिहून घेतला गळफास - Ambajogai city police station

मागील काही दिवसापासून गुरुप्रसाद सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालय आणि शिकवणीला जाऊन घरी परतला. दुपारी ४ नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे
author img

By

Published : Aug 8, 2019, 3:01 AM IST

बीड- आयुष्यात मी चांगला व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो’ असे भिंतीवर लिहून बारावीच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवल्याची घटना, जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी योगेश्वरी नगरी भागात घडली असून सदरील विद्यार्थी हा तणावात असल्याचे समोर आले आहे. सतत अयशस्वी होत असल्याने त्याने आत्महत्येचा पाऊल उचलल्याचे समजते आहे.

गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरुप्रसाद आपल्या कुटुंबासह योगेश्वरी नगरी येथील ‘शरयू’ इमारतीतील फ्लॅटमध्ये राहत होता. तो योगेश्वरी महाविद्यालयात बारावीला शिकायचा. त्याचे वडील शिक्षक आहेत तर त्याच्या दोन बहिणींचे लग्न झालेले आहे. मागील काही दिवसापासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालय आणि शिकवणीला जाऊन घरी परतला. तब्येत ठिक नसल्याने दुपारच्या सुमारास गुरुप्रसादची आई रुग्णालयात गेली होती तर वडील शाळेत होते. दुपारी ४ नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळी ७ वाजता आई-वडील घरी परतले. अनेकदा आवाज देऊनही गुरुप्रसाद दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून गुरुप्रसादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अभ्यासाच्या ताणावापायी कोवळ्या वयाच्या गुरुप्रसादने जीवन संपविल्याच्या घटनेमुळे सर्वजण स्तब्ध झाले आहेत.

........हा होता संदेश

आय क्विट..“या जगात राहणे आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक अवघड असते. मी नेहमीच एक चांगला व्यक्ती बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी मी अयशस्वी ठरलो. मॉम, डॅड, मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मला माफ करा. या परिस्थितीत मी जगू शकत नाही. आय क्विट.. (मी निरोप घेत आहे)” अशा आशयाचा संदेश, गुरुप्रसादने आत्महत्येपूर्वी भिंतीवर इंग्रजीत लिहून ठेवला आहे.

Intro: बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याने भिंतीवर सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

बीड- आयुष्यात मी चांगला व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो’ असे भिंतीवर लिहून बारावीच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले ची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बुधवारी सायंकाळी घडली ही घटना योगेश्वरी नगरी भागात गल्ली असून सदरील विद्यार्थी हा तणावात असल्याचेही समोर येत आहे सतत अयशस्वी होत असल्या होत असल्याचे कारण देखील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांनी लिहिले आहे

गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सुशिक्षित कुटुंबातील गुरुप्रसाद ने जे कारण भिंतीवर लिहून गळफास घेतला ते कारण अत्यंत शुल्लक आहे. विशेष म्हणजे गुरूप्रसाद याचे वडील अंबाजोगाई येथील एका शाळेत शिक्षक आहेत. बुधवारी गुरुप्रसाद ची आई बाजारात गेली होती व वडील शाळेवर होते. या दरम्यानच गुरुप्रसाद ने भिंतीवर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली 'मी आयुष्यात चांगला व्यक्ती होण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. मात्र मी सतत अयशस्वी होत आहे. अशी सुसाईड नोट गुरुप्रसाद ने भिंतीवर लिहिली आहे.

गुरुप्रसादला दोन बहिणी आहेत दोघीचंही लग्न झालेले आहे. हे कुटुंब योगेश्वरी नगरीमध्ये ‘शरयू’ इमारतीत फ्लॅटमध्ये राहते. गुरुप्रसाद सध्या योगेश्वरी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. मागील काही दिवसापासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जाऊन घरी परतला. दुपारच्या सुमारास त्याची आई तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात गेली होती आणि वडील शाळेत होते. दुपारी ४ वाजताच्या नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ७ वाजता आई-वडील घरी परतले. अनेकदा आवाज देऊनही गुरुप्रसाद दरवाजा उघडत नसल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करून गुरुप्रसादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अभ्यासाच्या ताणापायी कोवळ्या वयाच्या गुरुप्रसादने जीवन संपविल्याच्या घटनेमुळे सर्वजण स्तब्ध झाले आहेत.

आय क्विट..’ : “या जगात राहणे आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक अवघड असते. मी नेहमीच एक चांगला व्यक्ती बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी मी अयशस्वी ठरलो. मॉम, डॅड.. मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मला माफ करा. या परिस्थितीत मी जगू शकत नाही. आय क्विट.. (मी निरोप घेत आहे)” अशा आशयाचा संदेश गुरुप्रसादने आत्महत्येपूर्वी भिंतीवर इंग्रजीत लिहून ठेवला आहे.

Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.