ETV Bharat / state

जायकवाडीतून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू; बीडकरांना मिळणार दिलासा - माजलगाव धरणात 10 टीएमसी पाणी

जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणात 400 क्यूसेक इतक्या क्षमतेने पाणी सोडले जात आहे. जायकवाडीचे पाणी कालव्याद्वारे माजलगाव धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

जायकवाडी धरणामधून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू
author img

By

Published : Aug 9, 2019, 9:39 PM IST

बीड - जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणात 10 टीएमसी पाणी सोडणार आहेत. यातील अडीच टीएमसी. पाणी तत्काळ माजलगाव धरणात दाखल होणार आहे. सध्या 400 क्यूसेक इतक्या क्षमतेने हे पाणी सोडले जात आहे. उर्वरित पाणी टप्या-टप्याने सोडले जाणार आहे.

जायकवाडी धरणामधून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू

माजलगाव, वडवणी तालुक्यांसाठी वरदान असणारा माजलगाव मध्यम प्रकल्प तळाला गेला आहे. शेतीसाठी वापरात येणारे पाणी बंद करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याचा वापर नियंत्रणात ठेवला आहे. याच धरणातून बीड शहरासाठीची पाणी योजना आहे. सध्या धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने, बीड शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे.
बीड जिल्ह्या पावसाविना कोरडा आहे. त्यामुळे माजलगाव धरणामध्ये नवीन पाण्याची आवक नाही. जायकवाडीचे पाणी कालव्याद्वारे माजलगाव धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. किमान 3 टीएमसी पाणी सोडा, अशी क्षीरसागरांची मागणी होती. मात्र जायकवाडीमध्ये होणारी पाण्याची आवक आणि लोकभावना डोळ्यासमोर ठेवून माजलगाव धरणात 10 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. सध्या 400 क्यूसेस इतक्या क्षमतेने अडीच टीएमसी पाणी सोडले जात आहे. 48 तासांत ते माजलगाव धरणात पोहोचेल.

Intro:
जायकवाडी धरणातून माजलगाव ला सोडले पाणी; 400 क्युसेस क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरु

बीड- जायकवाडी धरणातुन उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात 10 टि.एम.सी. पाणी सोडणार आहेत, यातील अडीच टी. एम. सी. पाणी तात्काळ माजलगाव धरणात दाखल होणार आहे. सध्या 400 क्यूसेस इतक्या क्षमतेने हे पाणी सोडले जात आहे उर्वरित पाणी टप्याटप्याने सोडले जाणार आहे.
माजलगाव , वडवणी तालुक्यासाठी वरदान असणारा माजलगाव मध्यम प्रकल्प तळाला गेला आहे, शेतीसाठी वापरात येणारे पाणी बंद करण्यात आले तर पिण्याच्या पाण्याचा वापर नियंत्रणात आला, याच धरणातून बीड शहरासाठीची बँक वॉटर योजना आहे, धरणातील पाणी साठी अत्यल्प राहिल्याने बीड शहराला पंधरा दिवसाला एकदा पाणी पुरवठा करावा लागत आहे, बीड जिल्हा पूर्णपणे कोरडा आहे, नवा एक थेंब धरणामध्ये आलेला नाही, म्हणून जायकवाडी चे पाणी कालव्याद्वारे माजलगाव धरणात सोडण्यात यावे अशी मागणी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या कडे केली होती किमान 3 टी एम सी पाणी सोडा अशी मागणी ना जयदत्त क्षीरसागराची होती मात्र जायकवाडी मध्ये येणारी आवक आणि क्षीरसागराच्या मागणीचा हट्ट ,लोकभावना डोळ्यासमोर ठरवून माजलगाव धरणात 10 टी एम सी पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत, तातडीने आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सध्या 400 क्यूसेस इतक्या क्षमतेने अडीच टी एम सी पाणी सोडले जात आहे , 48 तासात ते माजलगाव धरणात दाखल होणार आहे उर्वरित 7 टी एम सी पाणी टप्याटप्याने आवक डोळ्यासमोर ठेवून सोडले जाणार आहे.
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.