ETV Bharat / state

बीडमध्ये स्कार्पिओची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू - बीड अपघात न्यूज

दुचाकी व स्कार्पिओच्या समोरासमोर झालेल्या धडकेच एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील नवा मोंढा मार्गावर घडली.

1 killed in Scorpio two-wheeler accident in beed
बीडमध्ये स्कार्पिओची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Jun 26, 2020, 10:06 PM IST

बीड - दुचाकी व स्कार्पिओच्या समोरासमोर झालेल्या धडकेच एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील नवा मोंढा मार्गावर घडली. दुचाकीवरील दोघांपैकी एक जण जागीच ठार झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी असून, त्याच्यावर माजलगाव ग्रामीण रूग्णालयात सुरू आहेत. ही घटना आज (शुक्रवारी) रात्री आठ वाजता घडली.

1 killed in Scorpio two-wheeler accident in beed
बीडमध्ये स्कार्पिओची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू
सिध्देश्वर अंकुश बादाडे व राजाराम सखाराम उबाळे हे दुचाकीवरुन (रा. शहाजानपुर, एम.एच.44, जे.442) माजलगावकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गवरील फुले पिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात माजगावहून गढीकडे येत असलेल्या स्कार्पिओने दुचाकीला (एम.एच.28, व्ही.7080) जोराची धडक दिली. यात दुचकीवरील सिध्देश्वर अंकुश बादाडे (वय 34 रा.शहाजानपुर ता.माजलगाव) हे जागीच ठार झाले तर राजाराम सखाराम उबाळे (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत. स्कार्पिओचा चालकही जखमी झाला असून त्यांच्यावर माजलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात होताच घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस जमादार शरद पवार, राऊत यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.