गंगापूर (औरंगाबाद) : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारी रोजी ढोरेगांव जवळील पेंढापुर फाट्याच्या मागील ऊसाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या मजुराला एका अज्ञात व्यक्तीचे मृतदेह (Youth Murder Case Aurangabad) आढळून आले होते. ऊसाच्या वाढ्याच्या खाली पडलेल्या या मृतदेहाला कोणीतरी अज्ञात इसमाने चेहरा विद्रुप करून मारल्याचे दिसून आले. (Unraveling of the murder case) घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली. (murder due to alcohol dispute) माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता पॅनकार्ड सापडल्याने मृतदेहाची ओळख पटली हा मृतदेह सुनिल प्रकाश जमधडे (रा. पाटोदा ता. जि. औरंगाबाद याचा असल्याचे समोर आले होते. (Aurangabad Crime) तर या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Latest news from Aurangabad)
३६ तासाच्या आत लावला तपास : गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतांना गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणावरुन खात्रीलायक माहिती मिळाली की, मयत सुनिल प्रकाश जमधडे हा १ जानेवारीला पंढरपुर येथील विरांश वाईन शॉप येथे अक्षय विर व त्याचे सोबतच्या अनोळखी इसमासह दारु विकत घेवून गेला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षयच्या पान रांजणगांव (खुरी) येथील राहत्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुनिल जमधडेचा आपणच खून केला असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, १ जानेवारीला अक्षय आणि त्याचा एक मित्र मयत सुनिल जमधड यास भेटले. त्यानंतर सुनीलच्या मोटारसायकलवर बसून पंढरपुरला पोहचत, तेथील विरांश वाईन शॉप येथून दारु विकत घेतली. तसेच सुनीलला दारु पाजुन त्याच्या मोटारसायकलवर ढोरेगांव येथे जेवणासाठी निघाले. मात्र रस्त्यातच अक्षय आणि सुनील यांच्यात भांडण झाले. यावेळी सुनीलला अक्षयने आधी काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यास ढोरेगांव ते पेंढापुरला जाणाऱ्या रोडलगत फौजी ढाच्याच्या पाठीमागे एका ऊसाचे शेतात घेऊन गेला. तिथे गेल्यावर अक्षयच्या मित्राने सुनीलचा रुमालाने गळा आवळला. तर अक्षयने सुनीलच्या गळ्यावर पाय ठेवुन मोबाईलमध्ये त्याला मारत असतांनाचे फोटो काढले.
चेहरा केला विद्रुप : अक्षय आणि त्याच्या एका मित्राने सुनीलला बेदम मारहाण केली. मात्र दोघेही एवढ्यावरचं थांबले नाहीत. तर सुनिल जमधडे याची ओळख पटू नये म्हणुन त्याच्या तोंडावर दगडाने मारुन त्याचा चेहरा विद्रुप करुन त्यास जिवे ठार मारले. त्यानंतर सुनीलचा मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून, त्यावर ऊसा वाढे टाकून फरार झाले.
यांनी केली कारवाई : ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठुबे,सय्यद झिया,दगडू जाधव लहू थोटे,नामदेव शिरसाठ, श्रीमंत भालेराव, दीपेश नागझरे, संजय घुगे, दीपक सुरोसे, उमेश बकले, वाल्मीक निकम, संतोष डमाळे, ज्ञानेश्वर मेटे ,रामेश्वर थापसे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश खंडागळे यांनी केली आहे.