ETV Bharat / state

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; रेल्वे रुळावर आढळले फक्त धड, डोके गायब - suspected dead body found in aurangabad

तरुणाचे धड सापडले असून डोके घटनास्थळावरून गायब असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

तरुणाचा संशयास्पद मृत्यू
तरुणाचा संशयास्पद मृत्यू
author img

By

Published : Dec 25, 2019, 6:01 PM IST

औरंगाबाद - शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाचे धड सापडले असून डोके घटनास्थळावरून गायब असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा - 'संभाजीनगर' नावासाठी भाजप आग्रही, औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांचा गोंधळ

गांधीनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत सूरज जाधव (वय 26) याला लहान भाऊ प्रकाश याने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता छावणी येथे राहत असलेल्या बहिणीकडे सोडले. बहिणीकडे रात्री जेवण करून घरी काम असल्याचे सांगून निघालेल्या चंद्रकांतचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 6 वाजता पोलिसांच्या निर्दशनास आली.

तरुणाचा संशयास्पद मृत्यू

हेही वाचा - 'निर्णयाचे स्वागत; मात्र, सरकारने 'ते' आश्वासन पाळावे'

या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली असता नातेवाईकांनी तो आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगून त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. चंद्रकांतचे धड सापडले असून डोके सापडले नसल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी हा अपघात असून यामध्ये घातपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे सांगितले. पोलिसांचा तपास सुरू असून सर्व शक्यता तपासल्या जातील, असे सांगितले.

Intro:शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या वेळी या युवकांचा धड सापडले असून मुडके घटनास्थलावरून गायब असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे

Body:शहरातील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत सुरज जाधव वय 26 वर्ष याला लहान भाऊ प्रकाश याने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता छावणी येथे राहत असलेल्या बहिणीकडे सोडले असता बहिणीकडे रात्री जेवण करून घरी काम असल्याचे सांगून निघालेल्या चांद्रकांतचा संशयस्पद मृत्यू झाला.ही घटना बुधवारी सकाळी 6 वाजता पोलिसांच्या निर्देशनास आली,या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले असता ठाण्यात आल्यावर नातेवाईकांनि तो आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगून त्याच्यासोबत घात पात झाल्याचे संशय व्यक्त केला,चांद्रकांतचे धड सापडले असून मुडके सापडले नसल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी हा अपघात असून या मध्ये घात पात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही तपस सुरू असून सर्व शक्यता तपासली जातील असे सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.