ETV Bharat / state

Woman Police Work For Saving Family: महिलांचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी महिला पोलीस घेतात पुढाकार - solve family disputes of women

कौटुंबिक वाद हा अनेकांच्या कुटुंबात डोकेदुखी ठरतो. हा वाद सोडण्यासाठी पुढाकार महिलांनाच घ्यावा लागतो, हे पोलीस विभागाच्या भरोसा सेलकडे पाहून लक्षात येते. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारीमुळे असणारे कौटुंबिक वाद सोडवण्यात महिला पोलीस वेगवेगळ्या युक्त्या करून न्याय निवाडा करताना दिसतात. त्यामुळे महिलेचे कुटुंब वाचण्यासाठी महिलाच पुढे सरसावतात असे म्हणायला हरकत नाही.

Woman Police Work For Saving Family
आरती जाधव
author img

By

Published : Mar 7, 2023, 10:24 PM IST

Updated : Mar 8, 2023, 7:07 AM IST

महिलांच्या समस्यांवर बोलताना अधिकारी आरती जाधव

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पोलीस विभागाच्या महिला तक्रार निवारण केंद्र म्हणजे भरोसा असेल यांच्याकडे कौटुंबिक तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. यात महिला आपल्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाबद्दल तक्रार नोंदवतात. त्यामध्ये अनेक वेगवेगळी कारणे नमूद केलेली असतात. ज्यामध्ये नवऱ्याकडून दारू पिल्यानंतर होणारी मारहाण, सासू-सासऱ्यांकडून केला जाणारा छळ, तर कधी पैशांसाठी दिला जाणारा त्रास यांचा समावेश असतो. अशावेळी दोन्ही बाजूने त्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यात तोडगा काढण्याचे महत्त्वाचे काम महिला पोलीस बजावतात. दिवसभर येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दिवस-रात्र तक्रार सोडवण्यासाठी प्रयत्न महिला पोलीस करतात.

अनेक वेळा होतात आरोप: महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार आल्यानंतर महिलेची सविस्तर तक्रार ऐकून घ्यावी लागते. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींना त्याबाबत विचारणा केली जाते. यामध्ये जर महिलेला खरंच त्रास दिला आहे का याबाबत स्पष्टता झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी समुपदेशन महिला पोलीस करतात. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी किंवा नियमाने दिलेला कालावधी देण्यात येतो. त्यानंतरही महिलेचा पती किंवा सासू-सासरे यांच्या वागणुकीत सुधारणा होत नसेल तर, शेवटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाते. तसे करत असताना खरंच त्यांची चूक आहे का? याची खातरजमा महिला पोलीस करतात. असे असले तरी गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने भरोसा सेलच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर, महिला आहे तर महिलांनाच साथ देतात. महिलांच्या बाजूने कायदे असल्याचा गैरफायदा उचलतात असा आरोप भरोसा सेलवर केला जातो. मात्र प्रत्यक्षात योग्य बाजू कोणाची हे पडताळल्यावरच आम्ही पावले उचलतो असे मत ग्रामीण भरोसा सेल पोलीस अधिकारी आरती जाधव यांनी सांगितलं.

महिलांची देखील आढळते चूक: कौटुंबिक न्याय निवाडा करणे अगदी सोपे नसते. त्यात तांत्रिक बाबी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. प्रत्येक वेळी महिलेने तक्रार दिल्यानंतर चूक तिच्या सासरच्या मंडळींचीच असेल असेही नसते. कधी कधी तिची स्वतःची ही चूक आढळून येते. विशेषतः आजच्या आधुनिक युगात वावरत असलेल्या नवविवाहित युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात चूक आढळून येते आणि त्यांच्याकडूनच छळ केल्याच्या तक्रार देण्यात येते. त्यामध्ये शहरातून ग्रामीण भागात विवाह झालेली युवती, जास्त शिक्षण घेतल्यानंतर सामान्य कुटुंबात झालेला विवाह यामुळे त्यांच्या राहणीमानात मोठा फरक पडतो. तो बदल त्यांना अडचणीचा ठरतो. त्यांच्या अनेक सवयीमुळे कुटुंबात वाद होतात. त्यातूनच तक्रारी नोंदवल्या जातात. मात्र अशा वेळेस महिला आहे म्हणून तिला पाठीशी न घालता तिची समजूत काढण्याचे काम महिला पोलीस करतात. कुटुंब जोडलेले असावे, ते विभक्त होऊ नये यासाठी महिला पोलीस अतोनात प्रयत्न करतात. यामध्ये स्वतःच्या कुटुंबात असणाऱ्या अडचणी देखील कुटुंबात असणाऱ्या अडचणींकडे त्या कानाडोळा करतात. कधी मुले आजारी असतात, कधी घरी पाहुणे येणार असतात. तर घरी काही अडचणी असतात. असे असले तरी महिला भगिनींचा कुटुंब वाचवण्यासाठी आपले कर्तव्य बजावतात. असे मत ग्रामीण भरोसा सेल पोलीस अधिकारी आरती जाधव यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलिसांचा विशेष सन्मान करायला हवा यात शंका नाही.

हेही वाचा: MLA Anil Parab : रामदास कदम यांना योग्यवेळी उत्तर देणार - अनिल परब

Last Updated : Mar 8, 2023, 7:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.