ETV Bharat / state

'यमराज लबाड बायकांना सेवा मुक्त कर', औरगांबादेत पत्नीपीडितांचं अनोखं आंदोलन

कधीकधी महिलांच्या चुकीची शिक्षा पुरुषांना भोगावी लागते. त्यात कायदेदेखील फक्त महिलांच्या बाजूने असल्याने पुरुषांचे म्हणणे कोणी ऐकत नाही, असा आरोप पत्नी पीडित संघटनेकडून केला गेला आहे.

'यमराज लबाड बायकांना सेवा मुक्त कर', औरगांबादेत पत्नीपीडितांचं अनोखं आंदोलन
author img

By

Published : Jun 15, 2019, 1:04 PM IST

औरंगाबाद - महाराष्ट्रात रविवारी वटपोर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करते. मात्र, औरंगाबाद येथे पत्नीपीडित पतींनी अनोखं आंदोलन छेडलं आहे. येथील वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुरुषांनी पुढच्या जन्मी, अशी पत्नी नको, अशी मनोकामना यमराजाकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहरात पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष संघटना आंदोलन करत आहेत. नवरा - बायको समान असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्यांच्यात भांडण झालं की चूक कोणाची का असेना शिक्षा मात्र पुरुषांना मिळते. कधीकधी महिलांच्या चुकीची शिक्षा पुरुषांना भोगावी लागते. त्यात कायदेदेखील फक्त महिलांच्या बाजूने असल्याने पुरुषांचे म्हणणे कोणी ऐकत नाही, असा आरोप पत्नी पीडित संघटनेकडून केला गेला आहे.

औरगांबादेत पत्नीपीडितांचं अनोखं आंदोलन

रविवारी वटसावित्री पौर्णिमा आहे. यादिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या चांगल्या स्वास्थाची मनोकामना करतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, अशी मनोकामना करतात. मात्र, या जन्मी नवऱ्याला छळणाऱ्या बायकांचं ऐकू नको त्या खोटं बोलत आहेत. या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मीतरी, अशी बायको देऊ नको, अशी मनोकामना करण्यासाठी पत्नीपीडित पुरुष संघटनेने औरंगाबादच्या वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या आणि यमराजाकडे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत.
सरकारने पुरुषांच्या हक्कासाठी कायद्यात बदल करावा, अशी मागणी आंदोनकर्त्यांनी यावेळी केली.

Intro:औरंगाबादच्या वाळूज परिसरात पत्नी पीडित संघटनेने अनोखं आंदोलन केलं. पिंपळाच्या झाडाची प्रदक्षणा मारून पुरुषांनी पुढच्या जन्मी ही पत्नी नको अशी मनोकामना यमराजाकडे केली.

Body:वटसावित्री पौर्णिमेला हिंदू संस्कृती नुसार जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून महिला वडाची पूजा करतात मात्र याच पूजेच्या विरोधात पत्नी पीडित संघटनेने पिंपळाच्या झाडाला दोरा बांधून पूजा करूत अनोखं आंदोलन केले.

Conclusion:गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहरात पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष संघटना आंदोलन करत आहेत. नवरा - बायको समान असल्याचा दावा केला जातो मात्र त्यांच्यात भांडण झाल की चूक कोणाची का असेना शिक्षा मात्र पुरुषांना मिळते. महिलांच्या चुकीची शिक्षा पुरुषांना भोगावी लागते. त्यात कायदे देखील फक्त महिलांच्या बाजूने असल्याने पुरुषांचं म्हणणं कोणी ऐकत नाही असा आरोप पत्नी पीडित संघटनेकडून केला गेला. रविवारी वटसावित्री पौर्णिमा असून हिंदू संस्कृती नुसार महिला वडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या चांगल्या स्वास्थाची मनोकामना करत जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा अशी मनोकामना करतात. मात्र या जन्मी नवऱ्याला छळणाऱ्या बायकांचं ऐकू नको त्या खोटं बोलत आहेत, या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मीतरी अशी बायको देऊ नको अशी मनोकामना करण्यासाठी पत्नीपीडित पुरुष संघटनेने औरंगाबादच्या वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षणा घातल्या आणि यमराजाकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. सरकारने पुरुषांच्या हक्कासाठी कायद्यात बदल करावा अशी मागणी आंदोनकर्त्यांनी यावेळी केली. आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.