औरंगाबाद - नोटरी पद्धतीने लग्न केलेली नववधू, रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधायला म्हणून माहेरी आली. पुन्हा सासरी जाण्याऐवजी अवघ्या सहा दिवसांतच ती गायब झाली. यामुळे वराला धक्का बसला. दरम्यान, तक्रारदार यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात धाव घेतली. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
३२ वर्षीय तक्रारदार वर अजय (नाव बदलले आहे) हा नेवासा येथील कापड व्यावसायिक आहे. पंढरपुरातील एका महिलेच्या मध्यस्थीने त्याने कांचनवाडीत २५ वर्षीय प्रिया (नाव बदलले आहे) ही मुलगी पाहिली. तिच्याशी लग्न ठरल्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या दोन्ही महिलांनी तिच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याचे सांगून दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र, राजेंद्रच्या नातेवाईकांनी हो-नाही करून एक लाख ७० हजार रुपये देण्यास तयारी दर्शविली. एक लाख ६५ हजार रुपये रोकड आणि पाच हजार रुपये एकाला फोन पे द्वारे पाठविले. त्यानंतर नोटरी पद्धतीने लग्न केले. त्यावर राजेंद्रचे नातेवाईक मंडळी पूनमला सासरी घेऊन गेले.लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच माहेरचा हट्ट २० ऑगस्टला ते नेवासा येथे गेल्यावर त्यांनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत २४ ऑगस्ट रोजी मंदिरात लग्न लावले. तेथे सूनमुख पाहण्यासाठी म्हणून पूनमला पुन्हा मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील चेन आदी दोन तोळ्यांचे दागिने घेतले. लग्न पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रक्षाबंधन साठी जाण्याचा हट्ट केला. दरम्यान अजयने त्यांना मित्राची कार भाड्याने घेत सोडवले.
अन् वधू गायब झाल्याचा फोन...
त्यानंतर अजय नेवासा येथे गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मध्यस्थी करणाऱ्या महिलेने राजेंद्रला फोन करून पूनम गायब असल्याचे कळविले. या प्रकारामुळे त्याला एकच धक्का बसला. त्याने तत्काळ एमआयडीसी वाळूज ठाण्यात पत्नी गायब झाल्याचे सांगितले. मात्र, हा प्रकार कांचनवाडी येथून सुरू झाल्याचे सांगून तेथील पोलिसांनी त्याला सातारा ठाण्यात पाठवले. या प्रकरणी अद्याप नोंद करण्यात आली नाही.