औरंगाबाद ( वैजापूर ) - गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली फेमस युट्यूबर बिंदास काव्या अखेर काल Famous missing YouTuber from Aurangabad found सापडलीये. काव्या औरंगाबादमधून थेट मध्यप्रदेशात Kavya Reached Madhya Pradesh from Aurangabad पोहोचली. गेल्या 24 तासांपासून ज्या काव्याचा शोध सुरु होता ती काव्या नेमकी आहे तरी कोण? पाहूया या रिपोर्टमधून.
युट्युबवर 43 लाखहून अधिक फॉलोअर्स - काव्या ही मूळची औरंगाबादची आहे. युट्युबवर तिचे 43 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. म्हणूनच तिची ओळख ही युट्युबर अशी बनली आहे. तर फेसबुकवरही तिचे फॅन मोठ्या प्रमाणात आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचलेली हीच काव्या ही रागाच्या भरात घर सोडून गेली YouTuber Bindass Kavya left home in anger होती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना अधिक काळजी होती. शुक्रवारी दुपारी 2 वाजता घरातून बेपत्ता झालेली काव्या ही शनिवारी दुपारपर्यंतच पोलिसांना सापडली आहे.
![युट्यूबर काव्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-aur-1-youtuberkavya-mhc10084_11092022102324_1109f_1662872004_94.jpg)
इंस्टाग्रामवर १ मिलिअन फॉलोअर्स - बिनधास्त काव्या तिच्या नटखट स्वभावामुळे सर्वांची आवडती आहे. लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांमध्येही तिचे रील्स चांगलेच लोकप्रिय आहेत . तिचे युट्यूबवर साडेचार मिलियन पेक्षाजास्त तर इंस्टाग्रामवर १ मिलिअन फॉलोअर्स आहेत.
शुक्रवारपासून बेपत्ता - युट्युबर शुक्रवारपासून बेपत्ता Famous YouTuber from Aurangabad missing since Friday झाली होती. या संर्दभात छावणी पोलिसात गुन्हा दाखल Crime in cantonment police करण्यात आला. अल्पवयीन मुलगी शुक्रवारपासून बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. दोनच दिवसांपूर्वी अमरावतीतील तरूणी बेपत्ता झाली होती. दिवसेंदिवस बेपत्ता तरुणींचे प्रकरण वाढत आहेत. युट्यूबर काव्या YouTuber missing from Aurangabad कमी कालावधीत फेमस झाली होती. कुटुंबीयांनी तिची चौकशी केली तेव्हा ती कुठेच सापडली नाही. तिचे लाखो फॉलोअरर्स आहे. शुक्रवारी ती घरी परतली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केला. पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली . पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, युट्यूबर काव्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याचा आरोप - दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 08.30 वा वडिल अभ्यासाच्या कारणावरुन रागवले होते. त्याकारणावरुन ती अंदाचे दुपारी 02.15 वाजेच्या सुमारास कोणास काही एक न सांगता घरातुन निघुन गेली. तिचा मैत्रीणीकडे, नातेवाईकाकडे, आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळुन अली नाही. अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तिने फुस लावुन पळवून नेल्याचे फिर्यादीत कुटूंबीयांनी म्हटले होते.