ETV Bharat / state

विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका; देवेंद्र फडणवीस म्हणतात 'आता नवीन डायलॉग शोधा' - वॉशिंग मशीन प्रयोग

Wadettiwar vs Fadnvis : रोहित पवार यांच्या करखान्यावर छापे टाकण्यात आल्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावर वडेट्टीवारांनी वॉशिंग मशीन प्रयोग सुरु झालेले दिसत असल्याची टीका केली. यावर काहीतरी नवीन डायलॉग शोधला पाहिजे, आता हे डायलॉग जुने झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणत चांगलाच पलटवार केला.

Wadettiwar vs Fadnvis
Wadettiwar vs Fadnvis
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 9:43 AM IST

विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर Wadettiwar vs Fadnvis : गुंडांना पोसणारं सरकार राज्यात आहे. तोडा फोडा राज्य करा, त्यामुळं हे सगळं सुरु आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली. तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर देत, "आता नवीन डायलॉग शोधा" असा पलटवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नासाठी हे दोन्ही नेते छत्रपती संभाजीनगरात आले होते, तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात कायदा राहिला नाही : "कायदा हातात घेऊन संरक्षण करणाऱ्या पोलिसांवर हाथ उचलणार असतील, तर कायदा धुळीस मिळणार असं दिसते. मोहोळ गोळीबार प्रकरण, पुणे, नागपूर सर्वत्र गुंडांचं राज्य आहे. कायदा हातात घेणारे पोसल्या जाताय, कायदा सुववस्थेचे तीन तेरा झाले आहेत. सरकारचं लक्ष नाही, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. रोहित पवार यांच्या कारखान्यांवर छापे पडत आहेत. त्यामुळं वॉशिंग मशीन प्रयोग सुरु झालेले दिसत आहे" अशी खोचक प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

देवेंद्र फडणवीसांचं पलटवार : रोहित पवार यांच्या कारखान्यावरील छापेमारी संदर्भात विजय वाड्डेटीवार यांनी खोचक प्रतिक्रिया देत पुन्हा वाशिंग मशीन सुरू झाली असं म्हटलं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "वडेट्टीवारांनी काहीतरी नवीन डायलॉग शोधला पाहिजे, आता हे डायलॉग बोर झाले आहेत" असा पलटवार केला.

अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नासाठी नेते शहरात : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नासाठी सर्वच राजकीय नेते शहरात दाखल झाले होते. त्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर आमदार आणि खासदारांनी सोहळ्यासाठी शहरात हजेरी लावली. त्यावेळी कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देण्यास नेत्यांनी नकार दिला. अंबादास दानवे यांचे पुत्र धर्मराज यांचा विवाह सोहळा शहरातील बीड बायपास परिसरात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी अनेक 'व्हीआयपी' शहरात दाखल झाले होते. यामुळं शहरात अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. यामुळं सामान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ 10 मिनिटांसाठी शहरात आले होते.

हेही वाचा :

  1. पुण्यात गँगवॉर नाही, गुंड कोणताही असो, योग्य बंदोबस्त करणार; शरद मोहोळ प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
  2. आधी तुमचं तुम्ही ठरवा, मगच 'वंचित'शी चर्चा करा; वंचित बहुजन आघाडीची स्पष्टोक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.