ETV Bharat / state

साई जन्मस्थान वाद: शिर्डी, पाथरी नाही तर 'या' ठिकाणी साईबाबा सर्वप्रथम दिसले - साई मंदिर

साईबाबा यांच्या चरित्रात उल्लेख असलेले चांदभाई हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील धुपखेडा येथे पोलीस पाटील होते. त्यांनाच साईबाबा सर्वप्रथम दिसले. बाबांनी त्यांना काही चमत्कार दाखवले. त्यानंतर चांदभाईंनी बाबांना धुपखेड्याला आणले आणि त्यानंतर काही दिवसांनी बाबा शिर्डीला गेले.

धुपखेडामध्ये साईबाबा सर्वप्रथम दिसल्याचा ग्रामस्थांचा दावा
धुपखेडामध्ये साईबाबा सर्वप्रथम दिसल्याचा ग्रामस्थांचा दावा
author img

By

Published : Jan 20, 2020, 7:12 PM IST

Updated : Jan 20, 2020, 10:50 PM IST

औरंगाबाद - साई जन्मस्थळावरून सुरू असलेल्या वादात आता जिल्ह्यातील धूपखेडा येथील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे. साईबाबा यांचे प्रगटस्थान धुपखेडा असून ते सर्वात आधी येथेच दिसले, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय या परिसराचा विकास करण्यासाठी निधी देण्यात यावा, असा ठरावही ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

धुपखेडामध्ये साईबाबा सर्वप्रथम दिसले, ग्रामस्थांचा दावा

हेही वाचा - पाथरीकरांना मुंबईचे निमंत्रणच नाही; मंगळवारच्या बैठकीत पुढील आंदोलनाचा निर्णय होणार

'साईबाबा यांच्या चरित्रात उल्लेख असलेले चांदभाई हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील धुपखेडा येथे पोलीस पाटील होते. त्यांनाच साईबाबा सर्वात आधी दिसले. बाबांनी त्यांना काही चमत्कार दाखवले. त्यानंतर चांदभाईंनी बाबांना धुपखेड्याला आणले आणि त्यानंतर काही दिवसांनी बाबा शिर्डीला गेले', असा दावा धुपखेड्याच्या ग्रामस्थांनी केला. धुपखेडा विकासाची मागणी आजची नसून खूप जुनी असल्याचा दावा माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केला.

हेही वाचा - 'असे' आहे साईबाबांचे पाथरीतील जन्मस्थळ; जातं, उखळ अन् बरंच काही...

साईबाबा धुपखेड्याच्या डोंगरात फिरत होते. त्यावेळी चांदभाई यांचा घोडा हरवला होता. तो घोडा साईबाबा यांनी शोधून दिला. त्यावेळी साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट झाली. चांदभाई यांनी त्यांना धुपखेड्याच्या आणले. त्यावेळी जगाला साईबाबा यांची ओळख झाली. या गावात राहत असताना साईबाबा अनेकवेळा गायब व्हायचे. ते लिंबाच्या झाडावर जाऊन बसायचे. ज्या झाडावर बाबा बसायचे, त्या झाडाचा पाला आजही कडू लागत नाही, असा दावा ग्रामस्थ करतात.

'जवळपास तीन ते चार वर्षे साईबाबा धुपखेड्याला राहिले. लोकांना त्यांनी चांगले वागायची शिकवण दिली. ज्या झाडावर ते बसायचे, तो परिसर आजही पूजनीय आहे. काही वर्षांच्या वास्तव्यानंतर ते शिर्डीला गेले आणि स्थायिक झाले, अशी आख्यायिका धुपखेडावासिय सांगतात.

हेही वाचा - ...म्हणून शिर्डीकरांचा पाथरीला विरोध; परभणीतील साईभक्तांचा आरोप

पाथरी आणि शिर्डीसोबतच या स्थळाचाही विकास करण्यात यावा, अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत. ग्रामसभेत याबाबतचा ठराव मंजूर करून या परिसराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती करण्यात आली आहे.

Intro:साई बाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेल्या वादात औरंगाबादच्या धूप खेडा येथील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे. साईबाबा यांचे प्रगटस्थान धुपखेडा असून बाबा सर्वात आधी इथेच दिसले असून तिथला विकास करण्यासाठी निधी द्या असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. Body:साई बाबा यांच्या चरित्रात ज्या चांद भाई यांचा उल्लेख आहे ते चांद भाई औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या धुपखेडा येथे पोलीस पाटील होते. त्यांनाच साईबाबा सर्वात आधी दिसले. बाबांनी त्यांना काही चमत्कार दाखवले त्यानंतर चांद भाई यांनीच बाबांना धुपखेडा येथे आणले आणि इथून बाबा शिर्डीला गेले असा दावा धुपखेड्याच्या ग्रामस्थांनी केला. धुपखेडा विकासाची मागणी आजची नसून ही मागणी खुपवर्षं जुनी असल्याचा दावा माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केलाय.
Conclusion:साईबाबा धुपखेड्याच्या डोंगरात फिरत होते. त्यावेळी चांदभाई यांचा घोडा हरवला होता. तो घोडा साईबाबा यांनी शोधून दिला. त्यावेळी साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट झाली. चांदभाई यांनी त्यांना धुपखेड्याच्या आणलं. त्यावेळी जगाला साईबाबा यांची ओळख झाली. धुपखेड्याच्या राहत असताना साईबाबा अनेकवेळा गायब व्हायचे. ते लिंबाच्या झाडावर जाऊन बसायचे. ज्या झाडावर बाबा बसायचे त्या झाडाचा पाला आजही कडू लागत नाही असा दावा ग्रामस्थ करतात. जवळपास तीन ते चार वर्षे साईबाबा धुपखेड्याला राहिले. त्याकाळात त्यांनी अनेक चमत्कार केले. लोकांना त्यांनी चांगल वागायची शिकवण दिली. ज्या झाडावर ते बसायचे त्याच्या खालीच त्यांचं स्थान आजही पूजनीय आहे. तिथून ते शिर्डीला गेले आणि तिथे स्थाईक झाले. मात्र बाबांचे चरण पाहिजे धुपखेड्याला लागले. ते राहत असलेल्या ठिकाणी आजही अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे पाथ्री आणि शिर्डी सोबत या स्थळाचा देखील विकास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. धुपखेडा येथे ग्रामसभेत तसा ठराव घेऊन तशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे. आमची मागणी जुनीच असून कोणाला देऊ नका अस आमचं म्हणणं नसून त्यांच्या सोबत आमच्या साई प्रगट झालेल्या या धार्मिक स्थळाला देखील विकास निधी देऊन भाविकांची सोय करा अशी मागणी असल्याच माजी आमदार संजय वाघचौरे यांनी सांगितलं. संजय वाघचौरे यांच्याशी खासबतचित केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
1to1
Last Updated : Jan 20, 2020, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.