औरंगाबाद - एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे स्थानकावर असलेले औरंगाबाद नाव खोडून तिथे संभाजीनगर असे लिहिले आहे. सोशल मीडियावर या अज्ञातांनी त्यांचे फोटोदेखील शेअर केले आहेत. याबाबत त्या व्यक्तीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकारी रामेश्वरम रोडगे यांनी सांगितले आहे.
सोशल मीडियावरही हे फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये असलेल्या व्यक्तींच्या गळ्यात भगव्या रंगाचा रुमाल पाहायला मिळतोय. त्यामुळे याबद्दल चर्चा होताना दिसत आहे.