ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंनी घरी बसून निबंध लिहावा, देवेंद्र फडणवीस यांची टीका - Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. मी मुख्यमंत्री असतो तर, या विषयावर निबंध लिहिण्याचा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिलाय.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 7:23 PM IST

देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका करताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): Devendra Fadnavis : शाळेत लहान मुलांना निबंध देतात मी शास्त्रज्ञ झालो तर, अशीच वक्तव्यं एक माणूस रोज करतोय. मी मुख्यमंत्री असतो तर हे केलं असतं तर असं केलं असतं, तसं केलं असतं. (Uddhav Thackeray) मात्र, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरात बसून राहिले. काहीच केलं नाही. (Essay on CM) आता घरात बसून निबंध लिहा. लोकांच्या कामाचं आम्ही पाहू अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आज केली. (Assembly Speaker) विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर अभ्यासपूर्ण निकाल दिल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत व्यक्त केलं. फडणवीस यांचा हस्ते गंगापूर जलसिंचन योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या कामकाजावर टीका केली. (Rahul Narvekar)

कार्यक्रमात झाली सामानाची पळवापळवी: गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमात वाटप करण्यात येणार असलेल्या वेगवेगळ्या किट लोकांनी पळवल्या. विशेषतः ज्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहिले, त्याचवेळी हा प्रकार घडला. फडणवीस यांनी आपल्या भाषणात सर्वांना शांत खाली बसायचं आवाहन केलं. मात्र तरी देखील एका बाजूला सामान पळवलं जात होतं. कामगार आणि खेळाडूंसाठी वाटप करण्यात येत असलेल्या किट लोकांनी पळवल्या. त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होत आहे. याआधी देखील प्रशांत बंब यांनी अशाच पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी देखील अशीच सामानाची पळवापळ पाहायला मिळाली होती.

मराठवाड्याची ओळख पुसायची आहे: मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केलं. गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याची योजना तयार केली होती; मात्र नंतर सरकार नसल्यानं ती योजना गुंडाळली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेची हत्या केली. परंतु, आपण आता ती मंजूर केली. सिंचनासाठी पैसे मिळवून दिले. सिंचनाच्या कामाला गती दिल्यानं अनेक गावांसाठी सिंचनाचा लाभ मिळेल अशी योजना आखली. मागील दिड वर्षांत अनेक प्रकल्पांना मान्यता दिली. जागतिक बँकेत जाऊन सांगली कोल्हापूरमध्ये पुराचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला आणण्यासाठी केंद्रानं आणि जागतिक बँकेनं मान्यता दिली. तर जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलाय. त्यामुळं सिंचनात फायदा होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आम्ही शब्द पाळणारे आहोत पळणारे नाहीत: गंगापूर सिंचन योजनेचे काम करण्यासाठी जानेवारीत येईल असं म्हटलं होत. मी सांगितलं त्यानुसार आलो. आम्ही शब्द पाळणारे आहोत पळणारे नाहीत, अशी खोचक टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली. राज्याला नैसर्गिक शेतीकडे वळायचं आहे. कृत्रिम साधनांमुळे जमीन खराब होत आहे. 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती मोहिमेत आणत आहोत. शेतीला सौर ऊर्जेवर वीज देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे विजेची समस्या दूर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तर राज्यात अनेक योजना आणण्यात आल्या, त्यात महिलांसाठी अर्धे तिकीट केले. तर आता 'लेक लाडकी योजने'त मुलगी जन्माला आली तर कुटुंबीयांना एक लाखांची मदत देणार आहो, असं त्यांनी सांगितलं. तर ठाकरे सरकारनं प्रत्येक योजनेत खंजीर खुपसला; मात्र आता सरकारवर शिक्का मोर्तब केला असं फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. राष्ट्रवादीचा देखील शिंदे गटाप्रमाणे प्रमाणे निकाल लागणार? वाचा शरद पवार गटाचे जयंत पाटील काय म्हणाले
  2. 'तसं' नाही झाल्यास मी भर चौकात फाशी घेईन, संतोष बांगर यांचं विधान
  3. मोदी सरकारचा १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प, ३१ जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.