कन्नड़(औरंगाबाद)- तालुक्यातील नागद येथे कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या दोन संशयिताचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी औरंगाबाद पाठविण्यात आले होते. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी दिली.
कन्नड तालुक्यात नागद येथील 55 वर्षीय व 58 वर्षीय दोघे सख्खे भाऊ असून हे दोघेही नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी चार दिवसांपूर्वी भडगाव जिल्हा जळगाव येथे गेले होते. मात्र, भडगाव येथील त्यांच्या चार नातेवाईकांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने या दोन्ही भावंडांना कन्नड़ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, पारिचारिक बी. बी. वाघ, ए. एस सुरासे, फार्मासिस्ट मधुकर मतसागर, टेक्नीशियन शशिकांत गांगुर्डे, व धनंजय दापके यांच्या पथकाने दोघांचे स्वॅब औरंगाबादला तपासणीसाठी पाठवले. दोघा भावांना ग्रामीण रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात ठेवण्यात आले आहे. दोघांचेही स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह ही बाब दिलासा देणारी ठरली आहे.