ETV Bharat / state

शेतात काम करणारे पिता-पुत्र बिबट्याच्या हल्ल्यात ठार, परिसरात दहशत

पैठण तालुक्यात आपेगाव येथे वडील आणि मुलाचा मृतदेह आढळला. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

author img

By

Published : Nov 17, 2020, 7:28 AM IST

Updated : Nov 17, 2020, 9:29 AM IST

leopard-attack
बिबट्याचा हल्ला

औरंगाबाद - शेतात काम करणारे पिता-पुत्र बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. ही धक्कादायक घटना आपेगाव शिवारात सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. कृष्णा औटे व अशोक औटे, असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

आपेगाव शिवारात घडला घटनेचा थरार-

पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात कृष्णा व अशोक हे पिता-पुत्र शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री आठच्या दरम्यान पाणी देत असताना पिकात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे बेसावध असलेल्या पित्रा-पुत्राचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

अशी उघडकीस आली घटना-

पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेले कृष्णा व अशोक हे रात्र झाली तरी घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले. त्यांनी याबाबतची माहिती शेजारी व गावकऱ्यांना दिली. त्यामुळे गावकरी त्या दोघांना शोधण्यासाठी शेतात गेले. यावेळी गावकऱ्यांना या दोघा बापलेकांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत शेतात आढळून आले. त्यामुळे याबाबतची माहिती गावकऱ्यांनी पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांना दिली. पवार यांनी तात्काळ याबाबत वनविभागाला कळवत घटनास्थळी धाव घेतली.

गेल्या वर्षीही घेतला होता बिबट्याने एकाचा बळी-

पैठण तालुक्यात गोदावरी काठालगत उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे बिबट्यांचा या परिसरात वावर आहे. सोमवारी रात्री बिबट्याने बापलेकांना ठार केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. यापुर्वीही बिबट्याने याच परिसरात एकाचा बळी घेतला आहे. मात्र तरीही वनविभागाने या परिसरात कोणतीही खबरदारी न घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा- दुचाकी आणि कंटेनरचा शिर्डीत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Last Updated : Nov 17, 2020, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.