छत्रपती संभाजीनगर: वेरूळ गावातील डमडम तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आयुष्य नागलोद (वय 7) आणि संकेत बामनावत (वय 17) अशी तळ्यात बुडालेल्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. दोघे तलावात पडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने गावात शोककळा पसरली.
पाण्यात बुडून मृत्यू: गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास संकेत आणि आयुष हे दोघेही डम डम तलाव परिसरात गेले होते. तिथे खेळत असताना त्यावेळी अचानक पाय घसरल्याने आयुष नागलोत तलावात पडला. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी संकेत बामणावत याने पाण्यात उडी घेतली. मात्र एकाला वाचवण्याच्या नादात दुसराही पाण्यात बुडाला. घटनास्थळी वाचण्यासारखे इतर कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. अगदी काही क्षणात पाण्यात बुडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी काढले बाहेर: संकेत आणि आयुष दोघेही पाण्यात पडल्याची घटना कळताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. पोहोता येणाऱ्या काही युवकांनी तलावात उडी घेतली. बराच वेळ शोध मोहीम घेतल्यानंतर दोघांचेही मृतदेह युवकांनी बाहेर काढले. त्यावेळी पूर्ण गावात शोककळा पसरली होती. त्यांच्या कुटुंबावर उडवलेला दुःखाचा डोंगर कोसळला, दोघांवर अंत्यविधी करण्यात आले.
तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू: याआधीही अशीच घटना घडली होती. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या तळेगाव वाडी येथे एका तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या पाच मुलींमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश होता. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या तळेगाव वाडी येथे ही घटना घडली होती. या पाच मुलींमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश होता. तर अन्य तीनजणी दुसऱ्या परिवारातील होते. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जाधव यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले होते.
हेही वाचा -