औरंगाबाद - वाळूज औद्योगिक परिसरात विक्रीसाठी आणलेली पाच गावठी पिस्तुले व 28 जिवंत काडतुसांसह दोघांना शनिवारी (दि. 6 मार्च) पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 7 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जालना येथील एका तरुणाकडे पिस्तूल असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने डीबी पथकाने आरोपीला पकडण्यासाठी बनावट ग्राहक तयार केले. ठरल्यानुसार ग्राहकाने काळेला फोन करून वाळूजला बोलावले. काळे व पवार हे दुचाकीने (एम एच 21 बी आर 0373) शनिवारी वाळूजला आले. त्याने तीन वेळा ठिकाण बदलून अखेर एका हॉटेलमध्ये बोलावले. तेव्हा दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सचिन मुराब पवार (वय 29 वर्षे, रा. रामगव्हाण वस्ती, ता.अंबड) व सुंदर भाऊसाहेब काळे (वय 19 वर्षे, रा. हिवरा रोषणगाव, ता.जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - कोरोनामुळे नाशिकमध्ये होणारे मराठी साहित्य संमेलन स्थगित
सोशल मीडियातून मिळाली पिस्तूल विक्रीची माहिती
एकाने माझ्याकडे कमी किमतीत विदेशी बनावटीचेपिस्तूल मिळेल, असे स्टेटस ठेवले होते. ते त्याने पाचोर (जि.जळगाव) येथील व्यक्तीशी संपर्क साधून 18 हजारांत एक पिस्तूल व काही काडतूस खरेदी केले. ते बजाज नगरातील ओळखी एका तरुणाला 30 हजारांत विकले. पुढे हाच व्यवसाय करण्याचे ठरवून त्याने अनेकांना पिस्तूल व काडतुसे विकली. निवडणुका जवळ आल्याने पाच पिस्तुलांची विक्री होईल, असे वाटल्याने हे पिस्तूल खरेदी केल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा - झटपट पैसे मिळविण्यासाठी चोरी करणारे दोघे जेरबंद