औरंगाबाद- जिल्ह्यात शनिवारी सकाळी 28 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1487 झाली आहे. यापैकी 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 69 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 481 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), सुराणा नगर (2), नारळी बाग (2), शिवशंकर कॉलनी (2), हमालवाडी (1), न्यु वस्ती जुनाबाजार (1), भवानी नगर, जुना मोंढा (5), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (1), शिवाजी नगर (1), उस्मानपुरा (4), रेहमानिया कॉलनी (1), रोशन गेट परिसर (2), नारेगाव परिसर (1), न्याय नगर (1) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये 18 पुरूष आणि 10 महिला रुग्णांचा समावेश आहे.
शुक्रवारी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून नऊ, जिल्हा सामान्य रुग्णालयातून बारा रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. मनपाची कोव्हिड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, घाटी रुग्णालय येथून आतापर्यंत एकूण 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबधितांची मृतांची संख्या वाढत चालली आहे.
शहरातील एन 12 हडको येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये आतापर्यंत घाटीत 58, खासगी रुग्णालयांमध्ये 10, जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 69 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सांगितले.