ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात विविध घटनांमध्ये तिघांच्या आत्महत्येने हळहळ - Mhada

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी विविध घटनांमध्ये ३ जणांनी आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी विविध घटनेत तिघांची आत्महत्या
author img

By

Published : Jul 26, 2019, 8:25 PM IST

Updated : Jul 26, 2019, 9:20 PM IST

औरंगाबाद - येथील वाळूज औद्योगिक नगरीत विविध घटनेत महिला व पुरुषाने तर वैजापूर येथील सटाणा गाव येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यात विविध घटनांमध्ये ३ जणांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात विविध घटनेत तिघांच्या आत्महत्येने हळहळ

अरुणा सोमनाथ डव्हाळे (वय २०, म्हाडा कॉलनी, वाळूज महानगर) या महिलेने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने छताच्या पाईपला गळफास घेत आत्महत्या केली. तर संजय रमेश शिंदे (पंढरपूर, वाळूज) यांनी ओढणीच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या दोन्ही घटनेप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनेतील आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

तिसरी घटना वैजापूर तालुक्यातील आहे. सागर जाधव (वय २१, रा. सटाणा, वैजापूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक महिती अशी की, मृत सागर हा तरुण शेतकरी आहे. घरच्यांसोबत शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करायचा. २३ जुलै रोजी त्याने विष पिल्याने तो अस्वस्थ झाला होता. ही बाब घरच्यांना लक्षात येताच त्यांनी त्यास तातडीने वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून त्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार सुरू असताना आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:औरंगाबाद च्या वाळूज औद्योगिक नगरीत विविध घटनेत महिला व पुरुषाने तर वैजापूर येथील सटाणा गाव येथे एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना आज समोर आल्या आहेत.
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध घटनेत तीन जणांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Body: अरुणा सोमनाथ डव्हाळे वय 20 (म्हाडा कॉलोनी, वाळूज महानगर) या महिलेने राहत्याघरी ओढणीच्या साहाय्याने छताच्या पाईप ला गळफास घेत आत्महत्या केली तर संजय रमेश शिंदे (पंढरपूर,वाळूज) यांनी ओढणीच्या साहाय्याने घराच्या लाकडी बली ला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. या दोन्ही घटने प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दोन्ही घटनेतील आत्महत्येचे करण मात्र गुलदस्त्यातच आहे पोलीस पुढील तपास करीत आहे. तर तिसरी घटना वैजापूर तालुक्यातील आहे.
सागर जाधव वय-21 (सटाणा, ता वैजापूर)असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे .या प्रकरणी अधिक महिती अशी की, मृत सागर हा तरुण शेतकरी आहे.घरच्या सोबत शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करायचा. 23 जुलै रोजी त्याने विषारी औषधी चे सेवन केल्याने तो अस्वस्थ झाला होता. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास तातडीने वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते तेंव्हा पासून त्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्याचा आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यात तीन आत्महत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.