ETV Bharat / state

औरंगाबाद: तीन दिवसीय जागतिक धम्म परिषदेचे आयोजन, दलाई लामा राहणार उपस्थित - औरंगाबाद जागतिक धम्म परिषदेचे आयोजन

22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबादमध्ये करण्यात आले आहे. नागसेन वन परिसरात ही तीन दिवसीय परिषद पार पडणार आहे. या सोहळ्याला दलाई लामा आणि भिक्खू महानायक महाथेरो डॉ. रकगोडा धम्मसिद्धी हजेरी लावणार आहेत.

बौद्ध भिक्खू
author img

By

Published : Nov 21, 2019, 11:37 PM IST

औरंगाबाद - 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबादमध्ये करण्यात आले आहे. बुद्धांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ऐतिहासिक औरंगाबाद शहरात हा 3 दिवसांचा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला दलाई लामा आणि भिक्खू महानायक महाथेरो डॉ. रकगोडा धम्मसिद्धी हजेरी लावणार आहेत.

औरंगाबादमध्ये तीन दिवसीय जागतिक धम्म परिषदेचे आयोजन

औरंगाबादमधील नागसेन वन परिसरात या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातून लाखो उपासक या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नागसेनवन परिसरातील स्टेडीयममध्ये भव्य एका बुद्ध नगरीची स्थापना केली जात आहे.

हेही वाचा - समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते महंमद खडस यांचे निधन

धकाधकीच्या जीवनात मनाचा समतोल राखण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज आहे. हे विचार रुजवण्यासाठीच औरंगाबादच्या भूमीत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दलाई लामा उपस्थित राहणार असल्याने देश-विदेशातून उपासकांचा ओढा या परिषदेकडे राहील, अशी माहिती आयोजकांनी दिली.

तिबेट, नेपाळ, कंबोडीया, श्रीलंका, व्हिएतनाम, कोरीया, आयर्लंड मधूनही उपासक या ठिकाणी दाखल झाले आहेत. चांगले विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी या परिषदेला हजेरी लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Intro:औरंगाबादेत 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान जागतिक धम्म परिषदेचं आयोजन कऱण्यात आलं आहे, या परिषदेला लाखो धम्म उपासकांची हजेरी असणार आहे, बुद्धांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ऐतिहासिक औरंगाबाद शहरात हा 3 दिवसांचा सोहळा रंगणार आहे, या सोहळ्याला दलाई लामा सुद्धा हजेरी लावणार आहेत.
Body:औरंगाबादच्या नागसेनवन परिसरात तीन दिवसां जागतिक धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, याची जय्यत तयारी सुरू आहे, देशभरातून लाखो उपासक या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय. त्यासाठी जय्यत तयारी सुद्धा सुरु आहे, नागसेनवन परिसरातील स्टेडीयमवर भव्य व्यासपीठाची उभारणी कऱण्यात येणार आहे, एक बुद्ध नगरी या ठिकाणी स्थापण करण्यात येतेय.. या परिषदेला बौद्ध धर्माचे विद्वान दलाई लामा येणार आहेत, तर भिक्खू महानायक महाथेरो डॉ रकगोडा धम्मसिद्धी सुद्धा मार्गदर्शन करणार आहे.. धकाधकीच्या जीवनात मनाचा समतोल राखण्यासाठी तथागतांच्या विचारांची गरज आहे हा विचार रुजवण्यासाठीच या भूमित परिषदेचं आयोजन कऱण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. दलाई लामा येत असल्यानं देश विदेशातून उपासकांचा ओढा य़ा परिषदेकडे असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. Conclusion:तिबेट, नेपाळ, कंबोडीया, श्रीलंका, व्हिएतनाम, कोरीया, आयर्लंड मधूनही उपासक याठिकामी हजेरी लावणार आहे, धम्माची शिकवण बुद्धांच्या विचाराची जगाला गरज आहे, त्यामुळं समान्यांनी सुद्धा परिषदेला हजेरी लावण्याचे आवाहान आयोजकांनी केले आहे. 3 दिवस या धम्म सोहळा औरंगाबादला होणार आहे, यो सोहळ्याच्या माध्यमातून औरंगाबादचे सुद्धा नाव जगभर जाणार आहे, बुद्धांच्या करूणेच्या, प्रेमाच्या मैत्रीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हे आयोजन औरंगाबादकरांसाठी आणि येणा-या उपासकांसाठी पर्वणीच म्हणाली लागेल.
Byte - डॉ हर्षदिप कांबळे, परिषदेचे मुख्य निमंत्रक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.