ETV Bharat / state

Aurangabad Crime : धक्कादायक! पुरोगामी महाराष्ट्रात गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न; तीन आरोपी अटकेत - भगवान खरात

औरंगाबादमध्ये गुप्तधन मिळविण्यासाठी मानवी बळीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन लीगल सेलच्यावतीने करण्यात आली आहे.

Aurangabad Crime
तीन आरोपी अटकेत
author img

By

Published : Jan 20, 2023, 10:50 PM IST

पीडितेची पत्नी सुनीता खरात माहिती देताना

औरंगाबाद : गुप्तधन काढण्यासाठी सवर्णांनी दलित इसमाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. 3 जणांनी भगवान खरात यांना दारू पाजून विवस्त्र करत जिवेमारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथे घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असली तरी पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन लीगल सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

अशी घडली घटना : सदरील घटना 27 नोव्हेंबरच्या रात्री घडली. मात्र पीडित भगवान खरात यांनी जबाब दिल्यानंतर नरबळीबाबत कलम लावण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथील भगवान खरात यांना विठ्ठल फरकडे, भाऊसाहेब फरकदे या सवर्ण समाजाच्या व्यक्तीसह आणि कचरू खरात याने त्यांना घरातून बोलून बाहेर नेले. त्यानंतर त्यांना दारू पाजून एका ठिकाणी खड्ड्यात उतरण्यास सांगितले. आत गुप्तधन आहे, खाली उतर अस सांगितले. मात्र भगवान यांना शंका आली आणि त्याने खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध पडले. प्रकरण अंगलट येईल अस वाटल्याने त्यांनी भगवान यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून, त्यांना गावाबाहेर फेकून दिले.

बेशुद्ध अवस्थेत सापडले : तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, धन काढण्यासाठी विवस्त्र करून त्याच्यावर कोंबडे ओवाळून, जादूटोणा करून मारहाण करण्यात आली. तर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. गावाबाहेर ते बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांना सापडले. सुरुवातीला प्राथमिक उपचार केल्यानंतर घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी खरात यांचा एक पाय आणि हात निकामी झाला असल्याचे निष्पन्न झाले. शस्त्रक्रिया करून त्यांचा उजवा पाय कापण्यात आला. ते अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वडोद बाजार पोलीस ठाण्यात खरात यांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार देण्यास उशीर ?: सदर घटना 27 नोव्हेंबरच्या रात्री हा प्रकार घडला असला तरी भीतीमुळे 4 डिसेंबरपर्यंत कुटुंबियांनी तक्रार दिली नाही. पोलिसांना याबाबत माहिती कळाल्यावर पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक केली. मात्र भगवान खरात बेशुद्ध असल्याने खरा प्रकार उघड झाला नव्हता. मात्र 19 जानेवारी रोजी त्यांनी पोलिसांना जबाब दिला आणि चित्र स्पष्ट झाले. तत्पूर्वीच पोलिसांनी ॲट्रॉसिटी व अंधश्रद्धा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

तक्रार मागे घेण्यासाठी धमकी : पीडित भगवान खरात घाटी रुग्णालयात दाखल असताना त्यांना आरोपीच्या कुटुंबीयांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांची पत्नी, आई, भाऊ यांच्या माध्यमातून तक्रार मार्ग घ्या असे वारंवार सांगण्यात आले. इतकच नाही तर घाटी रुग्णालयात येऊन त्यांना प्रत्यक्ष तक्रार माग न घेतल्यास परिणाम वाईट होईल, अशा पद्धतीने धमकावण्यात आले. त्यानंतर कुटुंबियांनी वंचित बहुजन लीगल सेलच्या मदतीने बेगमपुरा पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आता गावात जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळ सील करण्याबाबत मागणी करत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जनजागृती करणार असल्याची माहिती वंचित बहुजन लीगल सेलचे एम एन देशमुख यांनी दिली.

हेही वाचा : Girls Love Story: दोन मुलींची प्रेमकहाणी.. लग्नासाठी एकीने 'लिंग'च बदललं.. आता दुसरी म्हणतेय, 'पुन्हा मुलगी हो..'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.