ETV Bharat / state

One Village One Ganesha: 'एक गाव एक गणपती' संकल्पना राबवणारे औरंगाबाद जिल्ह्यातल 'हे' आदर्श गाव - वैजापूर तालुक्यातील बोरसर गाव

गणेशोत्सव म्हटले की, जिथे नजर जाईल तिथे बाप्पांचे दर्शन घडते. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथे-तिथे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. मात्र, एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. आणि अशीच एक गाव एक गणपतीची संकल्पना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील बोरसर या गावात आहे.

'एक गाव एक गणपती संकल्पना राबवणारे गाव
'एक गाव एक गणपती संकल्पना राबवणारे गाव
author img

By

Published : Aug 10, 2022, 10:58 PM IST

वैजापूर ( औरंगाबाद ) - गणेशोत्सव म्हटले की, जिथे नजर जाईल तिथे बाप्पांचे दर्शन घडते. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथे-तिथे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. मात्र, एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. आणि अशीच एक गाव एक गणपतीची संकल्पना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील बोरसर या गावात आहे.

'एक गाव एक गणपती संकल्पना राबवणारे गाव

गावात सर्वच सण याच पद्धतीने साजरे होतात - जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात लगतच निसर्गरम्य उर्सें हे गाव. जवळपास 6500 इतक्या लोकसंख्येची वस्ती असलेले हे गाव. गणरायाच्या माध्यमातून लोकांसमोर एक आदर्श उभा केला आहे. यंदाचे गणेशोत्सवाचे हे पाच ते वर्ष आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या गावात एक गाव एक गणपती ही आदर्श संकल्पना अखंडपणे राबवली जात आहे. केवळ गणेशोत्सवचे नव्हे तर या गावात सर्वच सण याच पद्धतीने एकत्र येऊन साजरे केले जातात असे नागरिक सांगतात.

या वर्ष देखील एक गांव गणपती - या गावात कवचित घर सोडून गणपती घरात बसवले जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करतात. दरवर्षी गणेशोत्सव आणि गौरी- गणपती उत्सवात इथं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, खेळांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे गावातले तरुण एकत्र येवून डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात. इथे बनवण्यात येणारा आरास ही इको फ्रेंडली असतो.

उत्सवासाठी गावाच्या बाहेरून देणगी घेतली जात नाही - उत्सवासाठी गावाच्या बाहेरून कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जात नाही. आणि गावातील कुणालाही मागण्याच्या गरज पडत नाही प्रत्येकजण स्वतः हा पुढे येऊन मदत करतो असे मंडळाचे सदस्य सांगतात, तर या माध्यमातूनच बोरसर गावाने जनतेला एकतेचा सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - डॉ. पी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर; वाचा, कोण आहेत वरवरा राव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.