ETV Bharat / state

खळबळजनक...! सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये चोरट्यांनी फोडले एटीएम - गॅस कटर

एटीएम मशीन फोडीच्या एका घटनेला 24 तास झाले नाहीत तोपर्यंत आणखी एक एटीएम फोडीची घटना समोर आली आहे. शहरातील पडेगाव परिसरात रस्त्यालगत असलेले एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चोरांनी गॅस कटरने एटीएम कापले

सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी फोडले एटीएम
author img

By

Published : Jul 14, 2019, 11:15 AM IST

औरंगाबाद - शहरातील एटीएम मशीन फोडीच्या घटनेला 24 तास झाले नसताना, आणखी एक एटीएम फोडीची घटना समोर आली आहे. शहरातील पडेगाव परिसरात रस्त्या लगत असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चोरांनी गॅस कटरने एटीएम कापले. मात्र चोरांचा प्रयत्न सफशेल अपयशी ठरल्याने एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली.

सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी फोडले एटीएम

शहरातील पडेगाव परिसरात रात्रीच्या सुमारास रस्त्यावर रहदारी कमी असते. याचाच फायदा उठवत चोरट्यांनी एटीएमवर पाळत ठेवून रात्रीच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरांनी गॅस कटरने एटीएम कापून रक्कम पळवण्याचा प्रयत्न होता. मात्र, चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने मशीन मधली रक्कम सुरक्षित राहिली. सलग दुसऱ्या दिवशी चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांचा रडारवर असल्याचे समोर आले आहे.

याआधी शनिवारी पहाटे बीड महामार्गावर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळवले होते. या मशीनमध्ये जवळपास 25 लाखांची रक्कम होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळी शाई लावून ही चोरी करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच 24 तासात शहरात अशीच दुसरी घटना घडली.

Intro:औरंगाबादेत शनिवारी रात्री एटीएम चोरल्याची घटना ताजी असताना शहरात आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न शहरात झालाय. पाडेगाव भागात असलेले एसबीआई बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडून रक्कम पळवण्याचा प्रयत्न केला. Body:पाडेगाव येथील एसबीआयचे एटीएम मशीन गॅस कटरने एटीएम कापून रक्कम पळण्याचा प्रयत्न होता. मात्र हा प्रयत्न फसल्याने एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली.
Conclusion:शनिवारी पहाटे बीड महामार्गावर असलेली एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळवले, या मशीन मध्ये जवळपास 25 लाखांची रक्कम होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळी शाई लावून ही चोरी करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच 24 तासात शहरात अशीच दुसरी घटना घडली. शहरातील पडेगाव परिसरात एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा धाडसी प्रयत्न झाला. गॅस कटरच्या साहाय्याने मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने मशीन मधली रक्कम सुरक्षित राहिली. सलग दुसऱ्या दिवशी चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांचा रडारवर असल्याचं समोर आलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.