औरंगाबाद - साहित्य संमेलनामध्ये काही अनिष्ट प्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. संमेलन व्यवसाय व्हायला नको म्हणून मी या लेखात माझी भूमिका मांडली आहे, असा खुलासा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'लेखात कोणावरही टीका नाही'
कौतिकराव ठाले पाटील यांनी केलेल्या लिखाणावर अनेकांनी टीका केली आहे. हे लिखाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका करणारे असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांवर मी टीका केली नाही. माझा लेख नीट वाचा असेही ठाले पाटील म्हणाले आहेत. माझ्या लेखात मी कुणावरच टीका केली नाही. मात्र, साहित्य महामंडळचा उपयोग कुणी स्वतः साठी करू नये म्हणून आम्ही हे लिहलय असही पाटील म्हणाले आहेत. हे साहित्य संमेलन लोकांचे संमेलन करायचे असेल, तर लोकांचा सहभाग, लोकांचा पैसे पाहिजे, फक्त राजकारण्यांनी पैसे दिले तर संमेलन त्यांचेच होईल प्रश्न ठाले पाटील यांनी उपस्थित केलाय.
'आम्हाला फक्त सूचना करण्याचा अधिकार'
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जातो, त्याला त्यावेळी आक्षेप घेता येत नाही. आम्हाला फक्त सूचना करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमची भूमिका लेखात मांडली. हे लिखाण म्हणजे पुढे याला दिशा द्यावी असे माझे मत आहे. त्यातून काही बदल झाला तर स्वागत आहे. या पार्श्वभूमीवरच अक्षरयात्रामधून आम्ही मत मांडले आहे. तुम्ही जेव्हा एखादे पद स्वीकारता तेव्हा जोखीम घ्यावी लागते. लोकांना अपेक्षित असते, की तुम्ही भूमिका मांडली पाहिजे. यामध्ये बदल होतील, ना होतील हे दुय्यम असे ठाले पाटील म्हणाले.