ETV Bharat / state

रोपवाटिकेत दडून बसलेल्या जंगली तडसास सुखरूप पकडले

अंबाडी शासकीय रोपवाटिकेत दडून बसलेल्या जंगली ताडसाला सुरखरूप पकडण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या टीमला यश आले आहे. अंबाडी रोपवाटिकेत तडस दडून बसलेला असल्याने त्याठिकाणी कार्यरत मजूर भयभीत झाले होते. याबद्दलची माहिती सामाजिक वनीकरण विभागातील लागवड अधिकारी सी.बी.बाणखेले यांनी दिली आणि या जंगली प्राण्यास पकडून जंगलात सोडण्याची विनंती केली.

रोपवाटिकेत दडून बसलेल्या जंगली तडसास सुखरूप पकडले
रोपवाटिकेत दडून बसलेल्या जंगली तडसास सुखरूप पकडले
author img

By

Published : Apr 7, 2020, 11:11 AM IST

औरंगाबाद - अंबाडी शासकीय रोपवाटिकेत दडून बसलेल्या जंगली ताडसाला सुरखरूप पकडण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या टीमला यश आले आहे. अंबाडी रोपवाटिकेत तडस दडून बसलेला असल्याने त्याठिकाणी कार्यरत मजूर भयभीत झाले होते. याबद्दलची माहिती सामाजिक वनीकरण विभागातील लागवड अधिकारी सी.बी.बाणखेले यांनी दिली आणि या जंगली प्राण्यास पकडून जंगलात सोडण्याची विनंती केली.

कन्नड येथील सहाय्यक वनरक्षक तथा रेस्क्यू टीमचे प्रमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी डब्ल्यू.ए.सय्यद, वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण कोळी यांच्यासह अनेकजण घटनास्थळी पोहोचले. या टीमने जाळी, दोरी तसेच इतर उपलब्ध साधनसामग्रीने तडसला सुखरुप पकडले. यावेळी रेस्क्यू टीम यांच्यासह वनसेवक सईद शेख,एस.एस.वाळके, विठ्ठल माळी, बाळू गायकवाड, जयदीप वाळके, राजेंद्र राठोड यानींही मदत केली.

रोपवाटिकेत दडून बसलेल्या जंगली तडसास सुखरूप पकडले

सदरील तडसाला मकरणपूर रोपवाटिका परिसर येथे सोडण्यात आले. पी. आर.चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉ. प्रवीण राठोड यांनी तडसाच्या आरोग्याची तपासणी केली. तडस सुस्थितीत असन लवकरच त्यास नैसर्गिक अधिवासात (अभयारण्य वनक्षेत्रात)सुरक्षित सोडण्यात येणार आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.