औरंगाबाद - जागतिक वारसा स्थळांना ( world heritage site ) मिळाला दर्जा कायमस्वरूपी नसतो, तो टिकवावा लागतो. सध्या भारतात नैसर्गिक वारसा स्थळ असलेले मानसरोवर ( Mansarovar ) सांस्कृतिक वारसा स्थळ असलेले हम्पी ही स्थळे ही अडचणीत आहेत. स्थानिक विक्रेते वेरूळ लेणी ( Yelora Caves ) प्रवेश करून साहित्य विक्री करत आहेत. कायदा असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.
पर्यटकांची काही ठिकाणी लूट- पर्यटस्थळी अनेक अडचणी निर्माण झाले आहेत. पर्यटकांची काही ठिकाणी लूट केली जाते आहे. त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. तर काही ठिकाणी पाकीटमार, चोरीच्या घटना या वाढल्या आहेत. या सर्वांच्या तक्रारी वाढल्यामुळे जागतिक स्तरावर दर्जा धोक्यात सापडल्याच चावले यांनी सांगितलं.
पर्यटकांची गर्दी नियंत्रित ठेवणे गरजेचे - जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणी चित्रे नैसर्गिक रंगाने तयार केलेली आहेत. तेथे रोज पाच ते दहा हजार पर्यंत भेट देतात. त्यांच्या श्वसनक्रियेमुळे आद्रता तयार होऊन सिल्वर उत्पत्ती होण्याची शक्यता असते. यामुळे ऐतिहासिक चित्रांना हानि पोहोचत आहे. पर्यटकांच्या गर्दींवरील नियंत्रणासाठी राज्य शासनाला अनेक वेळा इंटरप्रिटेशन सेंटर मागत असून त्यातील चार लेणीच्या रीप्लका आतून पर्यटकांना लेण्या चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील. त्यामुळे रंगकाम असलेल्या लेणीतील गर्दी कमी करता येईल असं देखील चावले यांनी सांगितलं.
व्ह्यू पॉईंट नष्ट होत आहे - अजिंठा लेणी स्वरूप ( world heritage site ) पाहण्यासाठी बाहेरून व्ह्यू पॉईंट आहे. मात्र तो देखील नष्ट होण्याच्या तयारीत आहे. जागतिक वारसा स्थळांच्या नैतिकता, आचारसंहितेनुसार दरवर्षी भागीदारकांची बैठक होणे आवश्यक आहे. मात्र गेल्या वीस वर्षापासून एकही बैठक झाली नाही. लेणापुर परिसरात 500 मीटरचा बफर झोन मध्ये लेणीच्या वरच्या बाजूने बांधकाम होत आहेत. त्यामुळे लेणीचा नैसर्गिक व्ह्यू पॉईंट गमवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बफर झोन वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा असं मत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी सांगितलं.